
बॉलिवूडचा (Bollywood) 'बादशहा' अर्थात अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'जवान'ची (Jawan) सध्या सगळीकडे हवा आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी या चित्रपटाच्या कमाईमध्ये घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. पण शनिवारी म्हणजेच वीकेंडला शाहरुख खानच्या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये मोठी वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जवान चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर भारतामध्ये ४४० कोटींपार कमाई (Jawan Collection Day 10) केली आहे. तर ९ दिवसांमध्ये वर्ल्डवाइड ७३५ कोटींची कमाई केली आहे.
'जवान' चित्रपट सध्या ७०० कोटींच्या क्लबमध्ये सहभागी झाला आहे. अशामध्ये आता अशी अपेक्षा केली जात आहे की वीकेंड संपल्यानंतर जवान भारतात ५०० कोटी रुपयांची कमाई करेल. तर जगभरात हा आकडा ७५० कोटींच्या पुढे जाईल. सध्या जवानची संपूर्ण टीम चित्रपटाच्या यशाचे सेलिब्रेशन करत आहेत. चित्रपटाबाबत संपूर्ण टीमवर शुभेच्छांचा, प्रेमाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.
९ दिवसांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल सांगायचे झाले तर, जवानने पहिल्या दिवशी ७५ कोटी, दुसऱ्या दिवशी ५३.२३ कोटी, तिसऱ्या दिवशी ७७.८३ कोटी, चौथ्या दिवशी ८०.१ कोटी, ५व्या दिवशी ३२.९२ कोटी, ६व्या दिवशी २६ कोटी, ७व्या दिवशी २३.१२ कोटी, ८व्या दिवशी २३.१२ कोटी कमाई केली होती. या चित्रपटाने एका आठवड्यात ३८९.८८ कोटींची कमाई केली होती. तर ९व्या दिवशी १९.१ कोटींची कमाई केली होती.
सलग बरेच दिवस कमाईचा आकडा घसरलेल्या जवानने मात्र दहाव्या दिवशी चांगली कमाई केली आहे. १०व्या दिवशी या चित्रपटाने ३१.५० कोटींची कमाई करत 'पठाण' चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला आहे. पठाणने रिलीजच्या १०व्या दिवशी फक्त १४ कोटींची कमाई केली होती. जवान हळूहळू इतर चित्रपटांचे रेकॉर्डब्रेक करत आहे. पण अद्याप त्याने बाहुबलीचा रेकॉर्ड मोडला नाही. बाहुबलीने जगभरात १००० कोटींची कमाई केली होती. त्यामुळे आता 'जवान' चित्रपट 'बाहुबली'चा रेकॉर्ड मोडू शकेल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.