Jawan Movie Review: 'जवान' ठरला मेगा ब्लॉकबस्टर, चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी केलं कौतुक; किती रेटिंग दिले?

Movie Critic Taran Adarsh: एटली कुमार दिग्दर्शित 'जवान' चित्रपटामध्ये शाहरुख खान, नयनतारा आणि विजय सेतुपती मुख्य भूमिकेत आहेत.
Jawan Review
Jawan ReviewInstagram @redchilliesent

Bollywood Actor Shah Rukh Khan:

बॉलिवूडचा (Bollywood) 'बादशाह' शाहरुख खानचा (Actor Shah Rukh Khan) बहुप्रतिक्षित 'जवान' चित्रपट आज प्रदर्शित झाला. फर्स्ट डे, फर्स्ट शोला शाहरुखच्या चाहत्यांनी जबरदस्त प्रतिसाद दिला. शाहरुख खानचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आज हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर शाहरुखच्या चाहत्यांमधील उत्साह पाहायला मिळाला.

रात्रीपासूनच चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांनी थिएटरबाहेर मोठी गर्दी केली होती. या चित्रपटाला पहिल्याच दिवशी मिळणाऱ्या भरघोस प्रतिसादामुळे हा चित्रपट सुपरहिट ठरून बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करणार असल्याचे सांगितले जात आहे. अशामध्ये चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या चित्रपटाबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

Jawan Review
Tharla Tar Mag Special Episode: ‘ठरलं तर मग’ मध्ये रंगला गोकुळाष्टमीचा उत्साह, सायली आणि अर्जुनने एकत्र फोडली दहीहंडी

एटली कुमार दिग्दर्शित 'जवान' चित्रपटामध्ये शाहरुख खान, नयनतारा आणि विजय सेतुपती मुख्य भूमिकेत आहेत. यासोबतच चित्रपटात दीपिका पदुकोण विशेष भूमिकेत आहे. जवान चित्रपटाची सुरुवात जोरदार झाली आहे. चित्रपट रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळत आहे. समिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिला हाफ सुपर आणि दुसरा हाफ सुपर होता. बहुतेक समिक्षकांनी या चित्रपटाचे पठाणपेक्षा चांगले वर्णन केले आहे. हा चित्रपट हिट किंवा सुपरहिट नसून ब्लॉकबस्टर असल्याचे फर्स्ट डे फर्स्ट शो पाहणाऱ्या प्रेक्षकांनी सांगितले.

Jawan Review
Joe Jonas And Sophie Turner Divorce: जो जोनास- सोफी टर्नर झाले वेगळे, सोशल मीडियावर पोस्ट करत केली घोषणा

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर जवानला मेगा ब्लॉकबस्टर म्हटले आहे आणि त्यांनी या चित्रपटाला साडेचार रेट केले आहे. तरण यांनी लिहिले की, हा हार्डकोर मसाला मनोरंजक आहे. जो शाहरुख खानच्या फिल्मोग्राफीमध्ये एक उल्लेखनीय जोड असेल. ऍटलीने शाहरुख खानला जनतेच्या कॅरेक्टरच्या रुपाने दाखवले आहे आणि तो आहे. पठाणच्याही पुढे जा जवान तुमचे मन आणि बॉक्स ऑफिस दोघांना जिंकण्यासाठी आला आहे.

Jawan Review
Jawan Leaked Online In HD Quality: ‘जवान’ च्या निर्मात्यांना मोठा झटका, चित्रपट प्रदर्शित होताच झाला लीक; कमाईवर होणार परिणाम?

तरणने यांनी पुढे सांगितले की, जवानकडे उत्कृष्ट रेजरशार्प स्क्रीनप्ले आहे. लक्ष वेधून घेणार्‍या काही घटना आहेत. उत्तम अॅक्शन सीक्वेन्स, आकर्षक फ्रेम्स, मजेदार साउंडट्रॅक आणि चित्रपटाचा वेग आणि उर्जा कमी होत नाही. विजय सेतुपती आणि शाहरुख या दोन योद्धांची ही टक्कर असली तरी ही जवानाची प्रेरक शक्ती आहे. तरण यांनी विजय सेतुपती, नयनतारा, दीपिका पदुकोण, संजय दत्त यांच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. त्यांनी लिहिले की, जवान हा शाहरुख खानचा चित्रपट असल्याचं बोललं जात आहे. यामध्ये काही शंका नाही की २०२३ हे शाहरुख खानचं वर्ष आहे.'

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com