
बॉलिवूडचा (Bollywood) किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'जवान' चित्रपट (Jawan Movie) नुकताच प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट धमाकेदार कमाई करत आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने तब्बल १२० कोटींची बक्कळ कमाई केली. या चित्रपटाला शाहरुखच्या चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
ऐवढंच नाही तर या चित्रपटाला प्रेक्षकांसह सेलिब्रिटींचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी हा चित्रपट पाहण्याची इच्छा व्यक्त केली. अशामध्ये बॉलिवूडची कॉन्ट्रवर्सी क्वीन कंगना रनौतने जवान चित्रपटाचे कौतुक करत शाहरुखला चित्रपटाचा देव म्हटले आहे.
अभिनेत्री कंगना रनौतने 'जवान'चित्रपटावर स्तुतीसुमने उधळली आहेत. कंगना रनौतने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम स्टोरीवरून एक पोस्ट शेअर करत शाहरुख खानला सिनेमाचा देव म्हटले आहे. यासोबतच कंगनाने 'जवान'च्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करत शाहरुखचे तोंडभरून कौतुक केले आहे. कंगनाने या स्टोरीमध्ये लांबलचक पोस्ट केली आहे.
या पोस्टमध्ये तिने असे लिहिले आहे की, '९० च्या दशकात एका प्रियकराची भूमिका साकरण्यापासून आपल्या प्रेक्षकांसोबत पुन्हा एकदा तेच कनेक्शन प्रस्थापित करण्यासाठी प्रेक्षकांच्या दीर्घ संघर्षानंतर अखेर ६० व्या वर्षी भारतीय सुपरहिरो म्हणून उदयास येणे हे खऱ्या आयष्यात महानायक होण्यापेक्षा कमी नाही. जेव्हा लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि त्याच्या निवडीची खिल्ली उडवली, परंतु त्याचा संघर्ष त्याच्या सर्व सहकारी कलाकारांसाठी एक मास्टर क्लास आहे. जे दीर्घ कारकीर्दीसाठी उत्सुक आहेत. त्याचा आनंद घ्या .'
इतकेच नाही तर कंगना रनौतने आपल्या पोस्टमध्ये अभिनेता शाहरुख खानला देवाची उपमा देखील दिली आहे. तिने असे लिहिले आहे की, 'शाहरुख खान हा सिनेमाचा देव आहे. एक देव ज्याची सिनेमाला फक्त त्याच्या मिठी आणि डिंपल्ससाठीच नाही तर काही गंभीर जग वाचवणासाठीही गरज आहे. तुझ्या चिकाटीला, मेहनतीला आणि नम्रतेला सलाम, किंग खान."
दरम्यान, शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट 7 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात शाहरुखसोबत अभिनेत्री नयनतारा आणि विजय सेतुपती देखील मुख्य भूमिकेत आहेत. अॅटली कुमार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 'जवान'मध्ये दीपिका पदुकोण आणि संजय दत्त कॅमिओ भूमिकेत दिसत आहेत. शाहरुखच्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी तब्बल १२० कोटींची कमाई केली आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.