
बॉलिवूडची (Bollywood) 'बेबो' म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) तिच्या आगामी 'जाने जान' चित्रपटामुळे (Jaane Jaan Movie) चर्चेत आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या माध्यमातून करीना ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) पदार्पण करणार आहे.
या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये करीना कपूर व्यग्र आहे. करीना कपूर तिचे लग्न, मुलांची नावं यामुळे चर्चेत राहिली आहे. करीना कपूरचे १० वर्षांपेक्षा मोठ्या सैफ अली खानसोबत लग्न, तिची प्रग्नेंसी, मुलं तैमूर आणि जेह यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी तिचे चाहते खूपच उत्सुक असतात. अशामध्ये करीनाने स्वत:च चाहत्यांना पडलेल्या या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.
करीना कपूर अनेकदा आपल्या वैयक्तीक आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे. 'जाने जान'च्या प्रमोशनदरम्यान करीना कपूरने आपल्या आयुष्याशी संबंधित अनेक प्रश्नांची परखडपणे उत्तरं दिली आहेत. करीना कपूरने सैफसोबत लग्न केल्यानंतर मोठा वाद झाला होता. त्यानंतर तैमूरच्या नावावरून देखील वाद झाला होता. यासर्व गोष्टींसह तिने मुलाचे नाव तैमूर का ठेवलं? यामागचं कारण तिने या मुलाखतीमध्ये सांगितले आहे. या मुलाखतीमुळे करीना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
नुकताच करीनाने इंडियन एक्स्प्रेसचा खास शो 'एक्स्प्रेस अड्डा'ला मुलाखत दिली. यावेळी करीनाने सैफसोबतच्या लग्नाबद्दल सांगितले की, 'सैफ १० वर्षांनी मोठा असल्याने मला काही फरक पडत नाही. वय कुठे महत्त्वाचे असते? तो आधीपेक्षा आता खूपच हॉट आहे. मी आनंदी आहे की, मी १० वर्षांनी लहान आहे. सैफ ५३ वर्षांचा आहे यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. वयाने काहीही फरक पडत नाही. आदर आणि प्रेम महत्वाचे आहे. आम्ही एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेतो.' तसंच, 'लोकं अंतरधर्मिय संबंधांबद्दल चर्चा करण्यात गरजेपेक्षा जास्त वेळ घालवतात. पण त्यांच्या या बोलण्याने आम्हाला काहीच फरक पडत नाही.'
करीना कपूरनेही तिचा मोठा मुलगा तैमूरच्या नावावरून झालेल्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. तैमूर म्हणजे ‘आयर्न मॅन’ आणि आम्हाला हे नाव खूप आवडते. अभिनेत्रीने सांगितले की, सैफ अली खानच्या मित्राचे नाव तैमूर होते. त्यामुळे त्याने विचार केला की जर मुलगा झाला तर त्याचे नाव तैमूर ठेवायचे. कारण सैफला त्याच्या मित्राचे नाव खूप आवडत होते. त्यामुळे त्याने मुलाचे नाव तैमूर ठेवले. जेव्हा तैमूरच्या नावावरून ट्रोल केले गेले तेव्हा आम्हाला खूप त्रास झाला.'
करीना कपूरने पुढे असे देखील सांगितले की,'पूर्वी तैमूर आणि जेहची आया जेव्हा आमचे संपूर्ण कुटुंब जेवायला बसायचे तेव्हा त्या देखील जेवायला बसायच्या. पण, फरक इतका होता की, ती वेगळ्या डायनिंग टेबलवर जेवायची. हे दोन्ही मुलांच्या लक्षात येऊ लागले आणि हे पाहून दोन्ही भावांना आश्चर्य वाटू लागले. ते मला विचारू लागले की, नैनी आमच्यासोबत का बसत नाहीत?'
'त्यानंतर तैमूर आणि जेह या दोघांनीही नैनीला कुटुंबासोबत बसून जेवण करण्याची विनंती केली. तेव्हापासून कुटुंबात एक नवीन परंपरा सुरू झाली आणि आता आम्ही सर्व एकत्र बसून जेवण करतो.' तसंच, 'नैनी कुटुंबातील एक महत्त्वाची सदस्य झाली आहे, ती आमच्या मुलांची काळजी घेते. सैफ आणि मी आमच्या मुलांना तिच्या भरवशावर सोडून कामाला जातो. त्यामुळे तिला समान प्रेम आणि आदर मिळायला हवा.', असं करीना म्हणाली.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.