Swara Bhaskar Trolled: मॅटर्निटी फोटोशूट करणं स्वरा भास्करला पडलं महागात, भगव्या ड्रेसमुळे ट्रोलर्सनी घेतली शाळा

Swara Bhaskar Maternity Photoshoot Viral: सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या स्वरा भास्करने नुकताच मॅटर्निटी फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत.
Swara Bhaskar Trolled: मॅटर्निटी फोटोशूट करणं स्वरा भास्करला पडलं महागात, भगव्या ड्रेसमुळे ट्रोलर्सनी घेतली शाळा
Saam Tv

Swara Bhaskar Maternity Photoshoot:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री स्वरा भास्करच्या (Swara Bhaskar) घरी लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. स्वरा भास्कर आई होणार असल्यामुळे खूपच खूश आहे. स्वराचे कुटुंबीय नव्या पाहुण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या स्वरा भास्करने नुकताच मॅटर्निटी फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत.

या फोटोशूटमध्ये स्वरा भास्करने आपला बेबीबंप फ्लॉन्ट केला आहे. स्वराचे मॅटर्निटी फोटोशूटचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एकीकडे हे फोटो पाहून स्वराच्या चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे तर दुसरीकडे काहींनी तिला चांगलेच ट्रोल केले आहे.

Swara Bhaskar Trolled: मॅटर्निटी फोटोशूट करणं स्वरा भास्करला पडलं महागात, भगव्या ड्रेसमुळे ट्रोलर्सनी घेतली शाळा
Anurag Kashyap And Hansal Mehta On Kangana Ranaut: 'मी खूप उद्धट आणि जिद्दी आहे', कंगना रनौतची इन्स्टा पोस्ट चर्चेत; असं का म्हणाली?

स्वरा भास्कर ट्रोल होण्यामागचे कारण म्हणजे तिचे मॅटर्निटी फोटोशूट नाही तर तिने फोटोशूटसाठी परिधान केलेला भगव्या रंगाचा ड्रेस हे आहे. फोटोशूटसाठी स्वराने भगव्या रंगाचा हाई स्लिट ड्रेस परिधान केला आहे. स्वराचे हे मॅटर्निटी फोटो व्हायरल होताच नेटिझन्स तिला ट्रोल करत आहेत. तिच्या डाव्या विचारधारेवरून तिला ट्रोल केले जात आहे. त्याचसोबत नेटिझन्स तिला तिच्या ड्रेसचा रंग आणि फोटोशूटसाठी बॅकग्राऊंडला असलेल्या भगव्या रंगावरून देखील तिला ट्रोल करत आहेत.

Swara Bhaskar Trolled: मॅटर्निटी फोटोशूट करणं स्वरा भास्करला पडलं महागात, भगव्या ड्रेसमुळे ट्रोलर्सनी घेतली शाळा
Aatmapamphlet Official Trailer Out: ‘आत्मपॅम्फ्लेट’चा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित, अतरंगी आणि तिरकस विनोदी प्रेमकथा अनुभवायला मिळणार

स्वराने भगव्या रंगाचा थाई- हाई स्लिट मॅक्सी ड्रेस परिधान केला आहे. ज्याला हॉल्टर नेक आहे. स्वराने आपले मॅटर्निटी फोटो आपल्या अधिकृत इन्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत त्याला सुंदर कॅप्शन देखील दिले आहे. तिने लिहिले की, 'प्रेग्नेंसी... पण त्याला 'फॅशन' बनवा! टॅलेंडेट @memoriesbybarkha सोबत या सहज कॅज्युअल शूटसाठी पूर्ण ग्लॅम मोडमध्ये कॅमेऱ्यासमोर येणं खूप मजेदार आहे. प्रग्नेंसी कोणत्याही इतर वेळेप्रमाणे ग्लॅमरसाठी चांगली वेळ आहे.'

स्वरा भास्करचे मॅटर्निटी फोटो पाहून काहींनी तिला येणाऱ्या नव्या पाहुण्यांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. काही यूजर्स मात्र तिला ट्रोल करत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'पार्श्वभूमीत भगवा, अजून किती अपमानित करणार अंधभक्त स्वरा.' एका यूजरने लिहिले की, 'ही सनातनी संस्कृती नाही, लाज वाटते.' तर अशाप्रकारच्या अनेक कमेंट्स करत स्वराला ट्रोल करण्यात येत आहे.

Swara Bhaskar Trolled: मॅटर्निटी फोटोशूट करणं स्वरा भास्करला पडलं महागात, भगव्या ड्रेसमुळे ट्रोलर्सनी घेतली शाळा
Shah Rukh Khan New Look: 'किंग खान'चा स्टायलिश आणि क्लासी लूक, चाहते पडले हेअरस्टाईलच्या प्रेमात; फोटो व्हायरल

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com