
बॉलिवूडचे (Bollywood) 'महानायक' अमिताभ बच्चन (Actor Amitabh Bachchan) सोशल मीडियावर (Social Media) खूप सक्रीय असतात. या माध्यमातून ते नेहमी आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात. कधी इन्स्टाग्राम (Instagram) तर कधी ट्विटरवर ते पोस्ट करत असतात. या माध्यमातून ते आपल्या चाहत्यांना नवीन प्रोजेक्ट, पर्सनल लाईफबद्दल माहिती देत असतात. नुकताच बिग बींची इन्स्टाग्रामची एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावर बिग बींच्या चाहत्यांनी आणि नेटिझन्सनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.
अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ सेटवरचा आहे. या व्हिडिओमध्ये बिग बींसोबत त्यांच्या पत्नी जया बच्चन या देखील दिसत आहेत. दोघेही एका ब्रँडच्या शूटसाठी आले होते. यावेळी दोघेही खुर्चीवर बसलेले दिसत आहेत. शुटिंगसाठी दोघेही रेडी झालेले दिसत आहेत. अशामध्ये बिग बींनी आपल्या मोबाइलच्या सेल्फी कॅमेऱ्यामध्ये गुपचूप एक व्हिडिओ शूट केला. या व्हिडीओमध्ये त्यांनी जया बच्चन यांना देखील दाखवले आहे.
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, जया बच्चन या सुरुवातीला खूपच गंभीर दिसत आहेत. पण बिग बींनी ज्यावेळी मोबाइलचा कॅमेरा त्यांच्या दिशेने केला तेव्हा त्यांनी गोड स्माईल दिली. बिग बींनी हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये 'कामावर' असे लिहिले आहे. बिग बींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटिझन्सने त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
सर्वांना माहिती आहे की, जया बच्चन या नेहमी कॅमेऱ्यापासून दूर राहतात. त्यांना फोटो आणि व्हिडिओ काढायला जास्त आवडत नाही. पापाराझी ज्यावेळी फोटो अथवा व्हिडिओ काढायला येतात तेव्हा ते अनेकदा चिडलेले तुम्ही पाहिले आहे. परवानगीशिवाय ते कोणालाच फोटो आणि व्हिडिओ काढून देत नाहीत. बिग बींनी त्यांची परवानगी न घेता व्हिडिओ काढल्यामुळे नेटिझन्स या पोस्टवर मजेशीर कमेंट्स करत आहेत.
या पोस्टवर एका नेटिझन्सने अशी कमेंट केली आहे की, 'फक्त अमितजींमध्येच जयाजींना क्लिक करण्याची हिंमत आहे.' दुसर्या नेटिझन्सने असे लिहिले की, 'तुम्ही त्यांना न विचारता व्हिडीओ शूट केला. आता घरी गेल्यानंतर तुमचं काही खरं नाही.' तिसऱ्या युजरने लिहिले की, 'तुमची पत्नी क्वचितच हसते. तुम्हीच त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणू शकता.' तर आणखी एका युजरने असे लिहिले आहे की, 'तुमच्या पत्नी क्विचित हसतात. तुम्हीच हे संभव करू शकता.' तर आणखी एकाने असे लिहिले की, 'मी कधीच त्यांच्या रागावलेल्या चेहऱ्यावर आनंद किंवा हसू पाहिलं नाही.' सध्या या व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.