
टीम इंडियाने (Team India) श्रीलंकेच्या विरोधात झालेल्या आशिया कप २०२३ चा शेवटचा सामना जिंकला. मोहम्मद सिराजच्या स्फोटक गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने आशिया कप 2023 च्या (Asia Cup 2023) अंतिम फेरीत श्रीलंकेचा दारूण पराभव केला. प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेल्या टीम श्रीलंकेला टीम इंडियाने अवघ्या ५० धावांमध्ये परत पाठवले. तर ५१ धावा करत टीम इंडियाने हा सामाना आपल्या नावावर केला.
मोहम्मद सिराजने या सामन्यात एकूण ६ विकेट घेतल्या. सिराजने एकाच ओव्हरमध्ये ४ विकेट घेतल्या. सिराजच्या या दमदार कामगिरीमुळे टीम इंडियाला हा सामना जिंकण्यात यश आले. पण सिराजच्या या कामगिरीवर बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Actress Shraddha Kapoor) नाराज झाली आहे.
झालं असं की, कालच्या सामन्यासाठी सर्वच क्रिकेटप्रेमी उत्सुक होते. हा सामना जास्त वेळ आणि अटीतटीचा व्हावा असे अनेकंना वाटत होते. पण सिराजने हा आपल्या स्फोटक गोलंदाजीच्या जोरावर सामना लवकरच आवरता घेतला. सिराजने अनेकांची संडे पार्टी लवकर संपवली. सिराजमुळेच अनेकांचा रविवार थंड गेला. त्यामुळेच बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर नाराज झाली. तिने यासंदर्भात इन्स्टावर पोस्ट केली.
श्रद्धा कपूरने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी शेअर करत मोहम्मद सिराजला प्रश्न विचारला आहे. श्रद्धाने इन्स्टा स्टोरीमध्ये तिचा कारमध्ये बसलेला फोटो शेअर केला आहे. श्रद्धाने पांढऱ्या रंगाची कॅप घातली असून तिने या कॅपला हात लावल्याचे दिसत आहे. या फोटोत श्रद्धा काहीशी नाराज देखील दिसत आहे. हा फोटो इन्स्टा स्टोरीवर ठेवत श्रद्धाने यावर कॅप्शनमध्ये असे लिहिले की, 'आता सिराजलाच विचारा की या फ्री टाईमसोबत काय करायचे?'
श्रद्धा कपूरची ही इन्स्टा स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. श्रद्धा कपूर ही क्रिकेटची मोठी चाहती आहे. दरम्यान, आशिया कप २०२३ चा अंतिम सामाना दुपारी पावणे चार वाजता सुरु झाला आणि पावणे सहापर्यंत म्हणजे अवघ्या दोन तासांमध्ये हा संपूर्ण सामना संपला. या सामन्यात टीम श्रीलंकेने १५.२ ओव्हर केले आणि टीम इंडियाने ६.१ ओव्हरमध्ये हा सामना जिंकला. हा सामना संपवून टीम इंडियाचे खेळाडू रात्री उशिरा भारतामध्ये दाखल देखील झाले.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.