ठरलं! 'कबीर सिंह'चा सीक्वल; भूल भुलैया ३ लवकरच; प्रोड्युसरनं दिली 'ही' अपडेट

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि कियारा आडवाणी यांचा भूल भुलैया २ बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी करताना दिसत आहे.
ठरलं! 'कबीर सिंह'चा सीक्वल; भूल भुलैया ३ लवकरच; प्रोड्युसरनं दिली 'ही' अपडेट
Bollywood News Bhool Bhulaiyaa 3 And Kabir Singh 2 in A row Producers Bhushan Kumar confirms

मुंबई: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aryan) आणि कियारा आडवाणी (Kiara Advani) यांचा भूल भुलैया २ (Bhool Bhulaiyaa 2) बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी करताना दिसत आहे. अवघ्या सहा दिवसांत या चित्रपटानं जवळपास ८३ कोटींचा गल्ला जमवला आहे. अक्षय कुमार आणि विद्या बालन यांची प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाच्या पहिल्या पार्टनेही प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता या दोन्ही चित्रपटांच्या यशानंतर 'भूल भुलैया ३' या चित्रपटाच्या निर्मितीची तयारी सुरू झाली आहे. निर्मात्यांनी स्वतःच याबाबत माहिती दिली आहे. तसेच कबीर सिंह (Kabir Singh)चा देखील सीक्वल येणार असल्याचे कळते. ( Bhool Bhulaiyaa 2 Movie Latest News In Marathi )

हे देखील पाहा -

एका मुलाखतीत निर्माते भूषण कुमार आणि मुराद खेतानी यांनी भूल भुलैया ३ आणि शाहीद कपूरचा 'कबीर सिंह २' बाबत महत्वाची अपडेट दिली आहे. कबीर सिंह हे आयकॉनिक पात्र आहे आणि त्याचा दुसरा भागही येऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. दुसरीकडे मुराद खेतानी यांनीही या पात्राचे खूपच कौतुक केले. ही भूमिका खूपच लोकप्रिय आहे, असे ते म्हणाले.

Bollywood News Bhool Bhulaiyaa 3 And Kabir Singh 2 in A row Producers Bhushan Kumar confirms
अभिनेते सतिश कौशिक एअरलाइनवर भडकले; केले 'हे' गंभीर आरोप

या मुलाखतीत भूल भुलैयाचा तिसरा पार्ट येणार का, असा प्रश्न विचारण्यात आला असता, आम्ही भूल भुलैया २ च्या फ्रेंचाईजीचा पुढे विस्तार करू शकतो, असे भूषण कुमार यांनी सांगितले. तिसरा भाग येऊ शकतो. त्याला खूप स्कोप आहे आणि त्याबाबत आम्ही आणखी सविस्तर माहिती देऊ, असेही ते म्हणाले. दरम्यान, कार्तिक आर्यनची प्रमुख भूमिका असलेला 'भूल भुलैया २' हा या वर्षातील सर्वात मोठी ओपनिंग मिळालेला चित्रपट ठरला आहे. कंगना रनौतच्या 'धाकड'ला या चित्रपटानं तगडी टक्कर दिली आहे. या चित्रपटाला केवळ दोन कोटी रुपयेच कमाई करता आली. यापूर्वीही रणवीर सिंहचा जयेशभाई जोरदार आणि अजय देवगणचा रनवे ३४ हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी चांगली कामगिरी करू शकले नाहीत. मात्र, भूल भुलैयानं बॉलिवूडला सावरलं. या आठवड्यात हा चित्रपट १०० करोड क्लबमध्ये एन्ट्री करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com