Fukrey 3 Song Out: 'फुकरे 3'चं पहिलं गाणं रिलीज, युट्युबवर 'वे फुकरे'चा धुमाकूळ

Fukrey 3 First Song Released: 'फुकरे ३' चित्रपटाचे पोस्टर, टीझर आणि ट्रेलर रिलीज झाला. त्यापाठोपाठ आता या चित्रपटाचं पहिलं गाणं रिलीज झाले आहे.
Fukrey 3 Song Out
Fukrey 3 Song OutSaam Tv

Fukrey 3 Movie:

बॉलिवूडमध्ये (Bollywood) सध्या एकापाठोपाठ एक जबरदस्त चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अशामध्ये सर्वजण 'फुकरे ३' चित्रपटाची (fukrey 3 Movie) आतुरतेने वाट पाहत आहे. फुकरे फ्रँचायझी हा कॉमेडी ड्रामा चित्रपट आतापर्यंत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आला आहे. या चित्रपटाचा तिसरा भाग म्हणजेच 'फुकरे ३' लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकताच 'फुकरे ३' चित्रपटाचे पोस्टर, टीझर आणि ट्रेलर रिलीज झाला. त्यापाठोपाठ आता या चित्रपटाचं पहिलं गाणं रिलीज झाले आहे.

Fukrey 3 Song Out
Zeeshan Ayyub Interview: ‘अरे चलो, कोना पकडलो...’ नवाझुद्दिनसोबत रोमान्स करतानाचा अनुभव झीशान अय्युबने केला शेअर

फुकरे चित्रपट त्याच्या जबरदस्त पात्रांसाठी तसेच प्रभावी गाण्यांसाठी ओळखला जातो. या चित्रपटाने 'अंबर सरिया', 'बेडा पार' आणि 'करले जुगाड करले'सह अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. आता 'फुकरे ३' चित्रपटाबाबतही चाहते अशीच अपेक्षा करत आहेत. या चित्रपटातील गाणी देखील जबरदस्त असतील अशा आशा चाहते व्यक्त करत आहेत. अशामध्ये ११ सप्टेंबर म्हणजे आज फुकरे ३ चित्रपटाचे पहिले गाणं 'फुकरे वे' रिलीज झाले आहे.

Fukrey 3 Song Out
Pooja Bhatt Controversy: आधी वडिलांना किस केलं, मग टॉपलेस फोटोशूट; अनेक वर्षांनंतर पूजा भटने दिलं स्पष्टीकरण

या गाण्यात हनी आणि चुचासोबत पंडितजीही नाचताना दिसत आहेत. 'वे फुकरे' हे फुट-टॅपिंग गाणं आहे. फुकरे ३ चं हे नवीन गाणं तनिष्क बागची यांनी संगीतबद्ध केले आहे. तर, देव नेगी आणि असीस कौर यांनी 'वे फुकरे' या गाण्याला आवाज दिला आहे. गाण्याचे बोल शब्बीर अहमद यांनी संगीतबद्ध केले आहेत. तर कोरिओग्राफी बॉस्को मार्टिस यांनी केले आहे. 'फुकरे ३' चे दिग्दर्शन मृगदीप सिंग लांबा यांनी केले आहे. २८ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

फुकरे ३ मध्ये पुलकित सम्राट, वरुण शर्मा, मनजोत सिंग आणि पंकज त्रिपाठी हे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. याशिवाय भोली पंजाबनच्या भूमिकेत रिचा चढ्ढा पुन्हा एकदा फुकर्सना क्लासेस देताना दिसणार आहे. 'फुकरे ३' च्या ट्रेलरमध्ये अली फजल दिसला नाही. या चित्रपटाच्या मागच्या दोन भागात या अभिनेत्याने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. 'फुकरे ३' मध्ये अली फजल असणार की नाही हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल.

Fukrey 3 Song Out
Mahesh Tilekar Post: ‘चारेक जण सोडले तर इतरांनी सरड्याप्रमाणे रंग बदलले...’ महेश टिळेकर यांच्या पोस्टने सगळेच चक्रावले

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com