
बॉलीवूड (Bollywood) अभिनेता सनी देओल (Actor Sunny Deol) सध्या 'गदर 2'च्या (Gadar 2 Movie) यशाचा आनंद घेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जादू करत ५०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. तारा सिंगच्या भूमिकेत आलेल्या सनी देओलला लोकांनी भरभरून प्रेम दिले. 20 वर्षांपूर्वी आलेल्या 'गदर' चित्रपटाप्रमाणेत 'गदर २'ला देखील प्रेक्षकांनी पसंती दिली. या चित्रपटाच्या यशानंतर सनी देओलने एक शोसाठी मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये सनी देओल भावुक होत कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडला.
सनी देओल मुलाखतीच्या कार्यक्रमासाठी पोहचताच प्रेक्षकांनी उभे राहून त्याचे स्वागत केले. त्यामुळे सनीला अश्रू अनावर झाले. यावेळी सर्वांनी सनीला भावुक होऊन रडताना पाहिले. सध्या सनी देओलचा रडतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सनीला असे रडताना पाहून चाहते देखील चकीत झाले आहेत. 'आप की अदालत'च्या प्रोमो व्हिडिओमध्ये रजत शर्मा सनी देओलचे स्वागत करताना दिसत आहेत.
शोच्या प्रोमो व्हिडिओमध्ये दिसत आहे की, जेव्हा प्रेक्षकांनी उभे राहून सनी देओलचे स्वागत केले तेव्हा त्याला आपले अश्रू आवरता आले नाहीत. तेव्हा रजत शर्माने त्याला विचारले की, तुमच्या डोळ्यात अश्रू का आले? तेव्हा सनी देओल अधिकच भावुक झाला आणि त्याचे अश्रू अनावर झाले. तो ढसाढसा रडू लागला. तर दुसरीकडे प्रेक्षक टाल्या वाजवून त्याला प्रोत्साहन देताना दिसत आहेत.
त्यानंतर सनी देओल आपले अश्रू पुसत सांगतो की, ज्याप्रकारे ही लोकं आनंदी होत आहेत. जे मी केलं आहे. मला विश्वात होत नाही की मी या लायक आहे की नाही. पण मला खात्री आहे की मी याच्या लायक नक्कीच आहे.'
आता सनी देओलचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांपासून ते सेलेब्सपर्यंत अनेक जण सनीचे खूप कौतुक करत आहेत. अमीषाने कमेंट करत लिहिले की, 'आपल्या इंडस्ट्रीतील सर्वात नम्र सुपरस्टार आणि संपूर्ण देश त्याच्यावर प्रेम करतो.' बॉबी देओलने आपल्या भावासाठी लिहिले, 'लव्ह यू ब्रदर.' तर बोनी कपूरने लिहिले की, 'जग विश्वास करेल की तू खूप संवेदनशील आहेस. कारण तू खूप चांगला माणूस आहेस.'
दरम्यान, 'गदर 2' ने रिलीजच्या काही दिवसांतच ५०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. 'गदर २' हा २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या हिट चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटात सनी देओल आणि अमिषा पटेलसोबत अमरीश पुरी, ओम पुरी आणि लिलेट दुबे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाने त्यावेळी 250 कोटींची कमाई केली होती.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.