
बॉलिवूड(Bollywood) अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukon) आणि 'किंग खान' शाहरुख खान यांच्या 'जवान' चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. 'जवान' फक्त भारताच नाही तर जगामध्ये जबरदस्त कमाई करत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई करतच चालला आहे.
सध्या या चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट आणि टीम 'जवान'च्या यशाचे सेलिब्रेशन करण्यात व्यस्त आहे. नुकताच या चित्रपटाच्या टीमची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी दीपिका आणि शाहरुखने जबरदस्त डान्स केला. त्यांचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत होता. अशामध्ये सध्या दीपिकाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केलेल्या फोटोंची जोरदार चर्चा होत आहे.
दीपिका पदुकोण आणि शाहरुख खानने या पत्रकार परिषदेच्या वेळी जबरदस्त ड्रेसिंग केली होती. दीपिकाने काळ्या रंगाची काठ असलेली पांढरी साडी परिधान केली होती. तर शाहरुख खानने काळ्या रंगाचा ब्लेझर आणि पॅन्ट आणि पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केला होता. शाहरुखच्या हेअरस्टाईलने सर्वांचे लक्ष वेधले. यावेळी दीपिका पादुकोणने शाहरुखसोबत काढलेले फोटो आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. हा फोटो सध्या व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरला आहे.
या फोटोमध्ये दिपीकाने शाहरुख खानला घट्ट मिठी मारत गालावर किस केल्याचे दिसत आहे. शाहरुख खानच्या चेहऱ्यावर देखील स्मित हास्य दिसत आहे. शाहरुख आणि दीपिका या फोटोंमध्ये खूपच क्यूट दिसत आहेत. दीपिकाने शेअर केलेल्या या फोटोंना चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत असून अनेक लाइक्स मिळाले आहेत. हा फोटो शेअर करत दीपिकाने कॅप्शनमध्ये 'हे माझ्यासाठी शेवटचं आहे.', असे लिहिले आहे. या पोस्टवर दीपिकाचा पती म्हणजेच अभिनेता रणवीरनं हार्ट इमोजी टाकत कमेंट केली आहे की, 'इश्क में दिल बना है, इश्क में दिल फना है...' रणवीरची ही भन्नाट कमेंटवर त्यांच्या चाहत्यांनी देखील कमेंट्स केल्या आहेत
दरम्यान, दीपिका पादुकोणने 'ओम शांती ओम' या चित्रपटातूनच बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. या चित्रपटात तिने शाहरुख खानसोबत काम केले होते. त्यांचा चित्रपट सुपरहिट ठरला होता. त्यानंतर त्यांनी 'हॅप्पी न्यू इयर', 'चेन्नई एक्सप्रेस', 'पठाण' या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. त्यानंतर आता जवानमध्ये देखील दोघांनी एकत्र काम केले आहे. दोघांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या सर्व चित्रपटांमध्ये दीपिका आणि शाहरुख दोघेही रोमान्स करताना दिसले आहेत. अशामध्ये आता दीपिका आणि शाहरुखचा हा क्युट फोटो त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.