
बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री परिणीती चोप्रा (Actree Parineeti Chopra) आणि आपचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) यांच्या लग्नाची चाहत्यांना खूपच उत्सुकता लागली आहे. परिणीती आणि राघवच्या लग्नाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. अशामध्ये दोघांच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका समोर आली आहे. येत्या २४ सष्टेंबरला परिणीती आणि राघव विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाच्या विधीला २३ सप्टेंबरपासूनच सुरुवात होणार आहे.
२४ सप्टेंबरला परिणीती आणि राघव हे पंजाबी रितीरिवाजांनुसार लग्नबंधनात अडकणार आहे. परिणीती आणि राघव यांच्या लग्नाचे सर्व कार्यक्रम उदयपूरच्या हॉटेल लीला आणि ताज लेक पॅलेसमध्ये होणार आहेत. समोर आलेल्या परिणीती आणि राघवच्या लग्नपत्रिकेनुसार, या जोडप्याच्या लग्नाचे कार्यक्रम २३ सप्टेंबरपासून सुरू होणार असून २४ सप्टेंबरपर्यंत चालणार आहेत.
राघव आणि परिणीती यांच्या लग्नाचे सर्व विधी उदयपूरमधील हॉटेल लीला आणि ताज लेक पॅलेसमध्ये होणार आहेत. याच हॉटेलमध्ये पाहुण्याच्या राहण्याची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राघव- परिणीती यांच्या लग्नाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि देशातील अनेक राजकीय मंडळी देखील त्यांच्या लग्नाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. २३ सप्टेंबरपासून मेहंदी, हळदी आणि संगीताच्या कार्यक्रमाला सुरू होणार असून २४ सप्टेंबरला दोघेही लग्नगाठ बांधणार आहेत. या जोडीने त्यांच्या संगीतसाठी ९० च्या दशकाची थीम देखील ठेवली आहे.
परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचा साखरपुडा दिल्लीत झाला होता. त्यांच्या साखरपुड्याला राजकारणी तसेच बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. आता या जोडप्याने लग्नासाठी उदयपूरची निवड केली आहे. दोघेही उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये लग्न करणार आहेत. परिणीती आणि राघवच्या लग्नाची दोघांच्याही चाहत्यांना खूपच उत्सुकता लागली आहे.
- चुडा समारंभ- २३ सप्टेंबर २०२३, सकाळी १० वाजता
- संगीत - २३ सप्टेंबर २०२३, संध्याकाळी ७ वाजता
- राघवची सेहराबंदी - २४ सप्टेंबर २०२३, दुपारी १ वाजता
- वरात - २४ सप्टेंबर २०२३, दुपारी २ वाजता
- वरमाला - २४ सप्टेंबर २०२३, दुपारी ३.३० वाजता
- सात फेरे - २४ सप्टेंबर २०२३ , दुपारी ४ वाजता
- बिदाई - २४ सप्टेंबर २०२३, संध्याकाळी ६.३० वाजता
- रिसेप्शन - २४ सप्टेंबर २०२३, रात्री ८.३० वाजता
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.