
बॉलिवूडचा (Bollywood) 'किंग खान' आणि साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा स्टारर 'जवान' चित्रपट (Jawan Movie) बॉक्स ऑफिसवर (Box Office) चांगली कामगिरी करत आहे. रिलीजच्या दिवशीच या चित्रपटाने बक्कळ कमाई केली होती. त्यानंतर या चित्रपटाचा कमाईच्या बाबतीत वेग मंदावला. पण दुसऱ्या आठवड्याच्या विकेंडला जवानने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केल्याचे दिसून येत आहे. रविवारी जवानने जी कमाई केली आहे त्यावरून असा अंदाज लावला जात आहे की लवकरच हा चित्रपट ५०० कोटींपार कमाई करेल.
शाहरुख खानचा 'जवान' दुसऱ्या रविवारी देखील ५०० कोटींच्या क्लबमध्ये पोहचू शकला नाही. ५०० कोटींपर्यंत पोहचण्यासाठी या चित्रपटाला आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. या चित्रपटाने आतापर्यंत ४७५.७८ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने 'गदर २' आणि 'केजीएफ' सारख्या चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवर आधीच रेकॉर्ड ब्रेक केला आहे.
जवानच्या जगभरातील कमाईबद्दल सांगायचे झाले तर, या चित्रपटाने ११ दिवसांत ८०० कोटींचा आकडा पार केला आहे. या चित्रपटाने १० दिवसांत ७९७.१० कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाची जादू अशीच कायम राहिली तर हा चित्रपट १००० कोटींपर्यंत कमाई करेल असा अंदाज वर्तवला जात आहे. जर या चित्रपटाने १००० कोटींपर्यंत कमाई केली तर 'जवान' चित्रपट 'बाहुबली २' चा नक्कीच रेकॉर्ड ब्रेक करेल.
जवान चित्रपटात नयनतारा आणि शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण कॅमिओ भूमिकेत आहे. या चित्रपटात विजय सेतुपती खलनायकाच्या भूमिकेत किलर स्टाईलमध्ये दिसत आहे. या सर्वांव्यतिरिक्त सान्या मल्होत्रा, प्रियामणी, सुनील ग्रोव्हर, एजाज खान, संजय दत्त असे अनेक कलाकार आहेत. ज्यांनी आपल्या अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.