
शाहरुख खानचा ‘जवान’ आज थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. ‘पठान’ला मिळालेल्या यशानंतर आता चाहते ‘जवान’ला देखील प्रचंड प्रतिसाद देत आहेत. अशातच आज दहीहंडीचा सण असल्यामुळे मुंबईतील एका गोविंदा पथकाने शाहरुखच्या ‘जवान’ला अनोख्या पद्धतीने सलामी दिलीय. मुंबईतल्या माहिमच्या एका थिएटरबाहेर, गोविंदा पथकाने थर रचून शाहरुखच्या ‘जवान’ला अनोखी सलामी दिलीय.
सध्या सोशल मीडियावर गोविंदा पथक सलामी देतानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. माहिमच्या गैटी गॅलेक्सी थिएटरबाहेर मुंबईकरांनी एकच गर्दी केली होती. यावेळी चाहत्यांनी एकच गर्दी करत चित्रपटाचं दणक्यात स्वागत केलं आहे. थिएटरच्या बाहेर टाळ्या आणि शिट्ट्यांचा वर्षाव करत या बहुप्रतिक्षित चित्रपटाचं स्वागत केलं आहे. आज पहाटे माहिमच्या गैटी गॅलेक्सी थिएटरबाहेर एका गोविंदा पथकाने ५ थर लावत चित्रपटाला अनोखी सलामी दिली आहे. यावेळी उपस्थित प्रेक्षकांनी व्हिडीओ प्रचंड व्हायरल केला आहे.
एकंदरीतच चित्रपटाच्या कमाईवर ट्रेड ॲनालिस्टसह निर्माते देखील लक्ष देऊन आहेत. चित्रपटाने पहिल्याच दिवशी लाखो तिकीटांची विक्री करत अनोखा विक्रमच रचला आहे. झूम डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, हिंदी भाषेत ‘जवान’ने 5,29,568, तमिळ भाषेत 19,899, तेलुगू भाषेत 16,230 इतक्या तिकीटांची विक्री झालेली आहे. IMAX फॉरमॅटमध्ये ‘जवान’ चित्रपट पाहण्यासाठी 11,558 तिकीटांची विक्री करून अनोखा विक्रम रचला आहे. दरम्यान, चित्रपटाची ही तिकीट विक्री पाहता ‘जवान’ने ‘पठान’चाही विक्रम मोडीत काढल्याची चर्चा होते.
चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत शाहरूख खान, नयनतारा, विजय सेथुपती, सान्या मल्होत्रा, प्रियामणी, अश्लेषा ठाकूर, लहर खान, रिद्धी डोगरा, संजीता भट्टाचार्य, गिरीजा ओक आणि आलिया कुरेशी हे सेलिब्रिटी आहेत. हिंदी, तमिळ, तेलुगू या तीन भाषेमध्ये ‘जवान’ आज अर्थात ७ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन ॲटली यांनी केलं असून निर्मिती गौरी खान यांनी केली आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.