Kriti Sanon-Prabhas : क्रिती सेनन करतेय 'बाहुबली' ला डेट? 'या' कारणामुळे चर्चेला उधाण

बॉलिवूडची परमसुंदरी क्रिती सेनन आणि सुपरस्टार प्रभास यांची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहेत.
Kriti Sanon Prabhas
Kriti Sanon PrabhasSaam Tv

मुंबई : बॉलिवूडची परमसुंदरी क्रिती सेनन(Kriti Sanon) आणि सुपरस्टार प्रभास(Prabhas) यांची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहेत. बी टाऊनपासून चाहत्यांपर्यंत सगळीकडे या दोघांच्याच चर्चा रंगल्या आहेत. खरं तर, हे सर्व करण जोहरच्या शो 'कॉफी विथ करण ७'(Koffee With Karan) मध्ये सुरु झालं. एका टास्कसाठी क्रितीने प्रभासला कॅाल केला आणि या चर्चेला उधान आलं. तेव्हापासून क्रिती आणि प्रभासच्या अफेअरची सर्वत्र चर्चा होत आहे. या नव्या हॉट कपलला एकत्र पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.

Kriti Sanon Prabhas
एसएस राजामौली दिग्दर्शित आरआरआर 'ऑस्कर'च्या चर्चेत

क्रिती सेनन आणि प्रभास 'आदिपुरुष' चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, 'आदिपुरुष'च्या सेटवर पहिल्या दिवसापासून क्रिती सेनन आणि प्रभासमध्ये खूप चांगले बॉन्डिंग आहे. सर्वांना आश्चर्य वाटले कारण प्रभास खूप लाजाळू आहे पण तो क्रितीशी मनमोकळेपणाने बोलतो. सेटवर दोघेही एकमेकांशी गप्पा मारण्यात खूप व्यग्र असतात. क्रिती आणि प्रभासची मैत्री खूप खास असल्याचं बोललं जात आहे. मात्र, दोघांच्या नात्याबाबत काहीही सांगणे घाईचे आहे.

Kriti Sanon Prabhas
KBC 14 : अमिताभ बच्चनच्या शोला मिळाला पहिला करोडपती, कोल्हापूरच्या कविता चावलाने जिंकले एक कोटी

असे दिसते की क्रिती सेनन आणि प्रभास यांना त्यांचे नाते जगासमोर उघड करण्यासाठी आणखी वेळ घ्यायचा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रभास आणि क्रितीला सेटवर एकमेकांसोबत वेळ घालवायला खूप आवडते. त्याचबरोबर 'आदिपुरुष'चे शूटिंग महिनाभरापूर्वी संपल्यानंतरही दोघांचे नाते कायम आहे. क्रिती सेनन आणि प्रभास अनेकदा एकमेकांना कॉल आणि मेसेज करत असतात. दोघांच्या मनात एकमेकांबद्दल स्ट्रॉन्ग फीलिंग असल्याचं बोललं जात आहे. पण त्यांना घाई करायची नाही.

मोठ्या पडद्यावर प्रभास आणि क्रिती सेननची नवीन जोडी पाहणे चाहत्यांसाठी खूप रोमांचक असणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'आदिपुरुष'मध्ये प्रभास 'राम' आणि क्रिती 'सीते'ची भूमिका साकारत आहे. दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच जानेवारी २०२३ मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com