UN मध्ये संबोधित करताना प्रियांका म्हणाली; सर्व काही ठीक नाही... VIDEO व्हायरल

प्रियांका चोप्रा संयुक्त राष्ट्र संघ युनिसेफ गुडविलची अॅम्बेसिडर आहे
priyanka chopra news
priyanka chopra newsinstagram @priyankachopra

मुंबई: बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra)अभिनयासह सामाजिक कार्यक्षेत्रात तिची ओळख निर्माण केली आहे. बॉलिवूडसह हॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री प्रियांका चोप्रा संयुक्त राष्ट्र संघाचा एक भाग असलेल्या युनिसेफ गुडविलची अॅम्बेसिडर आहे. याचदरम्यान अनेकदा प्रियांकाने जागतिक समस्यांकडे लक्ष वेधले आहे. प्रियांका चोप्रा २०१६ पासून ग्लोबल युनिसेफ गुडविलची अॅम्बेसिडर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ग्लोबल युनिसेफची सदिच्छा दूत म्हणून कार्यरत आहे. युनिसेफशी संबंधित सर्व उपक्रमामध्ये प्रियांका उपस्थित राहते आणि चाहत्यांना डिजीटल माध्यमाद्वारे अनेक माहिती देते.

priyanka chopra news
बॉलिवूडसोबत टॉलिवूडला देखील वाटतेय 'ही' भीती, घेतले काही महत्वपूर्ण निर्णय...

नुकताच प्रियांका चोप्राने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम हॅडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये प्रियांकाने न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रसंघ सभेत दुसऱ्यांदा बोलण्याची संधी मिळाली. याबद्दल आभार मानले आहेत. यासह तिने परिवर्तन शिक्षण समितीतही सहभाग घेतला. प्रियांकाने युनिसेफ गुडविल मध्ये (UNGA)शाश्वत विकास उद्दिष्टे आणि निर्देशांक (SDG ) याविषयी संबोधित करतानाचे व्हिडीओ फोटो शेअर केले आहेत. जे सोशल मीडिया व्हायरल होत आहेत.

प्रियांकाने न्यूयॉर्क संयुक्त राष्ट्रसंघ मुख्यालयातील व्हेनेसा नकाते (Vanessa Nakate), मलाला युसुफझाई (Malala Yousafzai), अमांडा गोरमन (Amanda Gorman), सोमाया फारुकी (Somaya Faruqi) आणि ज्युडिथ हिल (Judith Hill) यांच्यासोबतचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. फोटोंसोबत प्रियांकाने व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती संयुक्त राष्ट्रांच्या सभेत संबोधित करताना दिसत आहे. भाषणामध्ये प्रियंकाने लक्षवेधी मुद्दा हाताळला आहे. प्रियांकाने जगातील संकट आणि तापमान यावर भाष्य केले आहे. तिने जगात सर्व काही ठीक नसल्याचे सांगत सध्या जग 'केद्रंस्थानी' असल्याचे म्हटलं आहे.

priyanka chopra news
Salman Khan: भाईजानकडून वाढदिवसानिमित्त चाहत्यांना अनोखी भेट !

पोस्ट शेअर करताना प्रियांकाने कॅप्शनमध्ये, "संयुक्त राष्ट्रसंघची अभिमानास्पद प्रतिनिधी म्हणून, दुसऱ्यांदा युनिसेफ गुडविल (UNGA) बोलण्याची संधी मिळाली. सर्वाचे आभार!! या वर्षाच्या कार्यसूचीच्या शीर्षस्थानी शाश्वत विकास उद्दिष्टे (SDG ) आहेत. ते प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण एकत्रितपणे आले पाहिजे आणि त्यावर लक्ष केद्रिंत केले पाहिजे यासाठी महासचिव अँटोनियो गुटेरेस यांचे विशेष आभार मानले आहेत. प्रियांकाने तिच्या पोस्टमध्ये ट्रान्सफॉर्मिंग एज्युकेशन कमिटीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

Edited By- Manasvi Choudhary

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com