लग्नाआधीच प्रियंका चोप्राला बनायचं होतं आई; पण यामुळे सोडला हट्ट

Priyanka Chopra : जेव्हा तिने याबाबत आपल्या आईला कळवलं. तेव्हा तिची आई प्रियांकावर खूप चिडली
Priyanka And Nick
Priyanka And NickSaam Tv

मुंबई : देसी गर्ल प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनस (Nick Jonas) सुखी वैवाहिक जीवन जगत आहेत. दोघांच्या लग्नाला ३ वर्ष पूर्ण झाली आहेत. १ डिसेंबर २०१८ रोजी प्रियांका आणि निकचं लग्न झालं. त्यानंतर ती एका मुलीची आई देखील बनली. प्रियांकाने सरोगसीद्वारे (Surrogacy) एका मुलीला जन्म दिला. आपल्या मुलीबरोबर ती जीवनाचा आनंद घेत आहेत. प्रियांकाने आपल्या मुलीचे नाव मालती मेरी चोप्रा जोनास (Malti Marie Chopra Jonas) ठेवलं आहे. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की प्रियांकाला लग्नाआधीच आई बनण्याची इच्छा होती. मात्र, तिची ही इच्छा पूर्ण झाली नाही. एका मुलाखतीदरम्यान प्रियांकाने स्वत: या गोष्टीचा खुलासा केला होता.

Priyanka And Nick
स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी ठरला 'लॉक अप’चा विजेता

बॉलिवूडची देसी गर्ल म्हणून ओळखली जाणारी प्रियांका सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सोशल मीडियावरही ती आपला बराच वेळ घालवत असते. सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करणं प्रियांकाला नेहमी आवडतं. तिच्या या फोटोवर तिचे चाहते देखील कमेंट्सचा पाऊस पाडतात. जेव्हा प्रियांकाच्या चाहत्यांना ती आई झाल्याचे कळालं, तेव्हा त्यांचा आनंदाला पारावार उरला नाही. आई बनल्यानंतर अनेकांनी प्रियांकाला शुभेच्छा दिल्या तसेच तिचे अभिनंदनही केले. सध्या प्रियांकाच्या मुलीची एक झलक पाहण्यासाठी चाहतेही खूप उत्सुक आहेत.

दरम्यान, लग्नाअगोदर प्रियांकाला आई बनायचं होतं याचा खुलासा स्वत: प्रियांकाने एका मुलाखतीत केला होता. जेव्हा तिने याबाबत आपल्या आईला कळवलं. तेव्हा तिची आई प्रियांकावर खूप चिडली. मात्र, तरीही प्रियांका आई बनण्यावर ठाम होती. 'प्रियांकाला लग्न न करता मूल हवे होते, त्यासाठी तिला एका लहान मुलाला दत्तक घ्यायचे होते. पण कालांतराने तिने हट्ट सोडला आणि त्यानंतर आपल्या कामावर लक्ष केंद्रीत केले. यानंतर प्रियांका चोप्राने 2018 साली अमेरिकन अभिनेता आणि गायक निक जोनाससोबत लग्न केले.आता प्रियांका आणि निक सरोगसीद्वारे एका मुलीचे पालक बनले आहेत, ज्याची ते दोघेही एकत्र काळजी घेत आहेत.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com