
Salman Khan's New Film: शाहरुख खान आणि सलमान खानच्या चाहत्यांसाठी २५ जानेवारी हा दिवस फारच खास ठरला आहे. एकीकडे चाहते थिएटरमध्ये 'पठान'मधून शाहरुखची नवीन स्टाइल बघत आहेत. तर दुसरीकडे या चित्रपटासोबतच सलमानचा हा हटके लूकही चाहत्यांना फारच भावला आहे.
सलमानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाचा टीझर 'पठान'सोबतच मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. अधिकृतरित्या निर्मात्यांनी चित्रपटाचा टीझर अद्याप प्रदर्शित केला नसला तरी चाहत्यांना हा टीझर थिएटरमध्ये दाखवला जात आहे.
पहिल्या दिवशी 'पठान'चित्रपट पाहणारे चाहते सलमान खानला पाहण्यासाठी इतके उत्साहित झाले आहेत की त्यांनी थिएटर मधूनच सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. एका चाहत्याने ट्विटरवर 'किसी का भाई किसी की जान'चा टीझर शेअर केला आहे. टीझरमध्ये सलमान चर्चेत असून त्याचा ॲक्शन मोड लोकांना आकर्षित करत आहे.
शेअर करण्यात आलेल्या टीझरमध्ये सलमानच्या प्रत्येक हावभावावर टाळ्यांचा कडकडाट होताना दिसत आहे. लांब केसांचा सलमानचा लूक समोर येताच थिएटरमध्ये चाहत्यांच्या टाळ्यांचा कडकडाट झाला. सलमानचे चाहते या चित्रपटाला 'बावल' म्हणत आहेत.
या चित्रपटातील पूजा हेगडेची स्टाईलही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. टीझरमध्ये पूजा आणि सलमानची जोडी खूपच छान दिसत आहे. टीझर अॅक्शनने असलेला असून सलमानच्या चाहत्यांसाठी हा ट्रीटपेक्षा कमी नाही.
सलमानचा हा चित्रपट यावर्षी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. गेल्या मंगळवारी सलमानने चाहत्यांना माहिती दिली होती की, 'पठान' चित्रपटासोबतच त्याच्याही चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होणार आहे. शाहरुख आणि सलमानचा हा कॉम्बो लोकांना आकर्षित करत आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.