Harshdeep Kaur: हर्षदीप कौर गाताना का घालते पगडी? हे आहे कारण...

हर्षदीप कौरने 2008 मध्ये 'जुनून कुछ कर दिखाना का' या गायन स्पर्धेत भाग घेतला होता.
Harshdeep Kaur Birthday
Harshdeep Kaur Birthday Instagram @harshdeepkaurmusic

Harshdeep Kaur Birthday Special: बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका हर्षदीप कौरचा आज वाढदिवस आहे. हर्षदीपचा आवाज ही तिला मिळालेली देणगी आहे. तिच्या गायनाने ती सर्वांनाच मंत्रमुग्ध करते. सुफी संगीत जगतात तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिची गाण्याची पद्धती इतकाच तिचा पेहराव सुद्धा खास आहे. हर्षदीपला आपण नेहमी फुल देसी अवतारात पाहिले आहे. नेहमीच तिच्या डोक्यावर पगडी देखील असते. परफॉर्म करताना हर्षदीप पगडी का परिधान करते तुम्हाला माहित आहे का? चला तर मग जाणून घेऊया हर्षदीपच्या जीवनाशी संबंधित काही खास गोष्टींविषयी.

१६ डिसेंबर, १९८६ साली हर्षदीपचा दिल्ली येथे जन्म झाला. वयाच्या सहाव्या वर्षांपासून हर्षदीपने संगीताचे शिक्षण घेण्यास सुरूवात केली. हर्षदीपने तिचे शिक्षण दिल्लीमध्ये पूर्ण केले आहे. हर्षदीप जरी बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका असली तरी तिने पंजाबी, तामिळ, मल्याळम आणि उर्दू भाषेतही गायन केले आहे.

Harshdeep Kaur Birthday
Besharam Song Controversy: 'हिंदुत्वाचा अपमान करणारा चित्रपट...' आमदार राम कदम यांचा 'पठान' चित्रपटाच्या निर्माता-दिग्दर्शकांना इशारा

हर्षदीप गेली अनेक वर्ष संगीत क्षेत्रात काम करत आहे. परंतु तिला खरी ओळख मिळाली ती 'रंग दे बसंती' या चित्रपटातील 'इक ओंकार' या गाण्यामुळे. 'कंतियां करू' आणि 'दिलबरों' या गाण्याने हर्षदीपने चाहत्यांनी मने जिंकली. 'जुगनी' सॉन्ग', 'नचदे ने सारे', 'जालिमा', 'वारी बरसी', 'चोंच लड़ाईयां' ही गाणी आजही लोकांच्या प्ले लिस्टमध्ये वाजत असतात. (Song)

हर्षदीप कौरने 2008 मध्ये 'जुनून कुछ कर दिखाना का' या गायन स्पर्धेत भाग घेतला होता. या शोमध्ये तिने तिचे गुरू उस्ताद राहत फतेह अली खान यांच्यासोबत सूफीच्या सुलतान शैलीसाठी लढत दिली आणि ती जिंकली देखील. या शोच्या ग्रँड फिनालेचे खास पाहुणे असलेले मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी तिला 'सूफी की सुलताना' ही पदवी देऊन सन्मानित केले होते. (Celebrity)

हर्षदीपला सुफीची सुलताना म्हणून ओळखले जाते. ही सुलतान अनेकदा पगडीमध्ये परफॉर्म करताना दिसते. या मागचं नेमका कारण काय आहे हे जाणून घेऊया, 'जुनून कुछ कर दिखाना का' या स्पर्धेत हर्षदीपला डोकं झाकून गाणं गायचं होतं, काही धार्मिक कारणांमुळे ते आवश्यक होतं असं म्हटलं जातं. त्यामुळे तिने स्कार्फने डोके झाकण्याचा निर्णय घेतला. पण तिच्या भाऊजींनी तिला पगडी घालून परफॉर्म करण्याचा सल्ला दिला. त्यादरम्यान, शोच्या वातावरणानुसार, हर्षदीप लांब सूफी पोशाख असायची. तसेच तिच्यासोबत एक पग सुद्धा घ्यायची. हा शो जिंकल्यानंतर ही पगडी तिच्या पोशाखाचा एक भाग बनली आहे. हर्षदीपने आजही तिची ही ओळख कायम ठेवली आहे. त्यामुळे ती नेहमीच पगडी घालून परफॉर्म करताना दिसते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com