Bollywood Stars
Bollywood StarsSaam TV

Bollywood Celebrity: बॉलिवूडचा दाक्षिणात्य चित्रपटातही दरारा, सलमान-आलियासह या स्टार्सनी चित्रपटासाठी घेतले 'इतके' मानधन

बॉलिवूड कलाकारांना दाक्षिणात्य चित्रपटामध्ये काम करण्यासाठी घवघवीत फी दिली जाते.
Published on
Sanjay Dutt In KGF Chapter: 2
Sanjay Dutt In KGF Chapter: 2Saam TV

संजय दत्तने 2022 मध्ये पहिल्यांदा दाक्षिणात्य चित्रपटामध्ये काम केले. कन्नड भाषेतील 'केजीएफ चॅप्टर 2' या चित्रपटात संजय दत्तने महत्त्वाची भूमिका साकारली होती. प्रशांत नील दिग्दर्शित या चित्रपटासाठी संजय दत्तला जवळपास 9 कोटी रुपयांचे मानधन मिळाले होते.

Ajay Devgan In RRR
Ajay Devgan In RRRSaam TV

2022 मध्ये अजय देवगणचा पहिला तेलगू चित्रपट प्रदर्शित झाला होता. अजय देवगणन काम केलेला पहिला दाक्षिणात्य RRR होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन एस.एस. राजामौली यांनी केले होते. अजय देवगने या चित्रपटासाठी फक्त 7 दिवस शूट केले होते आणि त्यासाठी त्याला 35 कोटी रुपये मानधन देण्यात आले होते.

Salman Khan In Godfather
Salman Khan In Godfather Saam TV

2022 मध्ये सलमान खानने 'गॉड फादर' या चित्रपटाद्वारे तेलुगू चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. मोहन राजा दिग्दर्शित या चित्रपटासाठी सलमान खानला २० कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पण चित्रपटाचा मुख्य अभिनेता चिरंजीवी हा त्याचा चांगला मित्र आहे. याच कारणामुळे सलमानने फी घेण्यास नकार दिला.

Aishwarya Rai Bachchan In Ponniyin Selvan: I
Aishwarya Rai Bachchan In Ponniyin Selvan: ISaam TV

2022 मध्ये ऐश्वर्या रायने मणिरत्नम दिग्दर्शित तमिळ चित्रपट 'पोनियिन सेल्वन-1' काम केले होते. रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्या रायला या चित्रपटासाठी जवळपास 10 कोटी रुपयांचे मानधन मिळाले होते.

Alia Bhatt In RRR
Alia Bhatt In RRRSaam TV

2022 मध्ये आलिया भट्ट. एस. राजामौली यांच्या 'RRR' चित्रपटात दिसली होती. या चित्रपटासाठी तिने सुमारे 9 कोटी रुपये फी घेतली होती असे म्हटले जाते.

Amitabh Bachchan In Sye Narasimha Reddy
Amitabh Bachchan In Sye Narasimha ReddySaam TV

2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सई रा नरसिम्हा रेड्डी' या तेलगू चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. सुरेंदर रेड्डी दिग्दर्शित या चित्रपटाची फी घेण्यास अमिताभ यांनी नकार दिला होता. नंतर चित्रपटाच्या निर्मात्यांनी अमिताभ यांना 3 कोटी रुपयांचे दागिने भेट दिले होते.

Akshay Kumar
Akshay KumarSaam TV

दिग्दर्शक एस. शंकर यांच्या '2.0' या तमिळ चित्रपटात अक्षय कुमारने महत्त्वाची भूमिका साकारली होती. रजनीकांत स्टारर या चित्रपटासाठी अक्षय कुमारने जवळपास 60 कोटी रुपये मानधन घेतले होते. हा चित्रपट 2018 साली प्रदर्शित झाला होता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com