Sonam Kapoor : कुणीतरी येणार येणार... याच महिन्यात सोनम कपूरच्या घरी येणार चिमुकला पाहुणा

बॉलिवूडची स्टाइल आयकॉन सोनम कपूर लवकरच आई होणार आहे. कपूर-आहुजा कुटुंबीयांच्या घरी येणाऱ्या चिमुकल्या पाहुण्याच्या आगमनाची सगळेच वाट बघत आहेत.
sonam kapoor instagram
sonam kapoor instagram Saam Tv

मुंबई : बॉलिवूडची स्टाइल आयकॉन सोनम कपूर(Sonam Kapoor) लवकरच आई होणार आहे. कपूर-आहुजा कुटुंबीयांच्या घरी येणाऱ्या चिमुकल्या पाहुण्याच्या आगमनाची सगळेच वाट बघत आहेत. या महिन्यात सोनम कपूरच्या घरी चिमुकला पाहुणा येणार आहे. 'गुड न्यूज'नंतर संपूर्ण कपूर फॅमिली नवीन पाहुण्याच्या स्वागताची तयारी करत आहे.

sonam kapoor instagram
Chakda Xpress : अनुष्का शर्माला व्हायचंय 'झुलन गोस्वामी'; थेट इंग्लंडमध्ये जाऊन घेणार स्पेशल ट्रेनिंग

माहितीनुसार, सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांच्या पहिल्या मुलाचा जन्म सोनमच्या आई-वडिलांच्या म्हणजेच अभिनेता अनिल कपूरच्या(Anil Kapoor) घरी होणार आहे. लग्नानंतर सोनम कपूर लंडनमध्ये पती आनंद आहुजासोबत राहत आहे. आनंद आणि सोनम यांचे दिल्लीतही आलिशान घर आहे. सोनम तिच्या पालकांच्या घरी ६ महिने राहणार आहे. त्यानंतर सोनम तिच्या पतीसोबत लंडनला जाईल. त्यानंतर सोनम पुन्हा बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. तिच्याकडे अनेक चित्रपट आहेत. त्यांचे चित्रीकरण पूर्ण करण्यावर तिचा भर असेल.

sonam kapoor instagram
विराटची नवी इनिंग सुरू लवकरच; सोशल मीडियावरील 'त्या' फोटोने चर्चेला उधाण

सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांची जोडी चाहत्यांना खूप आवडते. त्यांच्या घरी येणाऱ्या चिमुकल्या पाहुण्याची पहिली झलक बघण्यासाठी फॅन्स उत्सुक आहेत. सोनमने गरोदरपणात अनेक फोटोशूट केले आणि सोशल मीडियावर शेअरही केले. सोनमने अनेकदा बेबी बंप फ्लॉंट केले होते. सोनमच्या बेबी शॉवरचा सोहळा लंडनमध्ये पार पडला होता. कपूर कुटुंबीयांनीही मुंबईत सोनमच्या बेबी शॉवर फंक्शनची तयारी केली होती, पण शेवटच्या क्षणी कोविड महामारीमुळे त्यांना सर्व कार्यक्रम रद्द करावे लागले होते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com