Ranveer Singh: रणवीरकडून बिग बॉसच्या स्पर्धकाला खास शुभेच्छा; पोस्ट करत म्हणते 'खास व्यक्तीकडून कौतूक'

यंदा बिग बॉसच्या घरात अभिनेत्री तेजस्विनी लोणारी सहभागी झाली आहे. त्या खेळामुळे अनेक प्रेक्षक तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहे. आता चक्क बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने तिचे कौतुक केले आहे.
Ranveer Singh
Ranveer Singh Saam Tv

Ranveer Singh: सध्या मराठी टेलिव्हिजनवरील 'बिग बॉस मराठी'ची बरीच चर्चा होत आहे. मराठी कलाकारांपासून हिंदी कलाकारांपर्यंत बिग बॉसचेच वारे वाहत आहेत. गेल्या ५० दिवसांहून अधिक दिवसांपासून बिग बॉसच्या घराची चर्चा सर्वत्र होत आहे.पहिल्या दिवसाची सुरुवातच धडाकेबाज भांडणाने झाली होती.

तेव्हापासून ते आतापर्यंत बिग बॉसच्या घरात भांडणं जोरात सुरु आहेत. जितकी भांडणं होतात तितकेच त्यांची मैत्री ही खूप निखळ आहे. सध्या बिग बॉसच्या घरात हत्ती- मुंगी हे कार्य सुरु आहे. या कार्यात कोण कॅप्टन होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Ranveer Singh
Poonam Dubey: चलो, थोडी आग लगाए...पूनमच्या बोल्डनेसनं ओलांडल्या सर्वच मर्यादा, VIDEO पाहून अंगाची होणार काहिली...

बिग बॉसच्या घरात अनेक सदस्यांना टास्कपेक्षा नॉमिनेशनचीच सर्वाधिक भीती असल्याचे दिसते. त्यामुळे अनेक सदस्य नॉमिनेशनपासून दूर कसे राहता येईल याच्याच प्रयत्नात असतात. यंदा बिग बॉसच्या घरात अभिनेत्री तेजस्विनी लोणारी सहभागी झाली आहे. त्या खेळामुळे अनेक प्रेक्षक तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहे. आता चक्क बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने तिचे कौतुक केले आहे.

Ranveer Singh
Celebs Kids Name 2022: आलियापासून ते सोनमपर्यंत, या सेलिब्रिटींच्या मुलांची नावं आहेत 'युनिक'; जाणून घ्या...

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने बिग बॉस स्पर्धक तेजस्विनी लोणारीला खास शुभेच्छाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. तेजस्विनीने स्वत:च्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत रणवीर म्हणतो, “तेजू तू ५० दिवस पूर्ण केले आहेत. तुला खूप खूप शुभेच्छा. महेश सरांनाही माझा नमस्कार. मला तुझी आठवण येते. तू जिंकून ये आपण जंगी सेलिब्रेशन करुया.”

“एका उत्साही व्यक्तीकडून त्याच्या खास व्यक्तीला शुभेच्छा आल्या आहेत. हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणीही नसून चित्रविचित्र फॅशन, अभिनय आणि इतर सर्व गोष्टींमुळे चर्चेत असलेला अभिनेता रणवीर सिंग. खूप खूप धन्यवाद.

आमच्या #TerrificTejaswini ने बिग बॉस मराठीच्या घरात ५० दिवस यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल तिचे अभिनंदन. तसेच तिच्या बिग बॉसच्या घरातील उर्वरित प्रवासासाठी खूप खूप प्रेम आणि शूभेच्छा. तसेच ती यशस्वी व्हावी यासाठी धन्यवाद” असे कॅप्शन देत तेजस्विनीने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

Ranveer Singh
Hardeek Akshaya Wedding: तुझ्यात जीव रंगला… राणादा-अंजलीबाई बांधणार लग्नगाठ, कधी आणि कुठे?

ही व्हिडिओ शेअर केल्यानंतर तेजस्विनीच्या चाहते चांगलेच आनंदीत आहेत. रणवीरने दिलेल्या या शुभेच्छा तिला किती उर्जा देणार हे महत्वाचे ठरणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com