Pathan Movie Booking: लाखोंची तिकीट आणि करोडींची कमाई, प्रदर्शनापूर्वीच 'पठान' चित्रपटाची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

'पठान' चित्रपट अॅडव्हान्स बुकिंगमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत समाविष्ट झाला आहे.
Pathan Advance Booking
Pathan Advance Booking Saam Tv

Pathan Movie Advance Booking: शाहरुख खानचा आगामी चित्रपट काहीच दिवसात चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. 'पठान' चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. देशभरात या चित्रपटचे अॅडव्हान्स बुकिंग खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. दोन दिवसातच 'पठान' चित्रपटाने अनेक चित्रपटांचे अॅडव्हान्सचे बुकिंग रेकॉर्ड मोडले आहेत. किंग खानच्या या बहुप्रतीक्षित चित्रपटाला प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे 'पठान' चित्रपट अॅडव्हान्स बुकिंगमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत समाविष्ट झाला आहे.

Pathan Advance Booking
Bigg Boss 16: बिग बॉस १६ 'या' स्पर्धकाला मिळणार चित्रपटामध्ये काम करण्याची संधी, सलमानने स्वतः जाहीर केले नाव

साउथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार यशचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'KGF 2' ला गेल्या वर्षी रिलीज होण्यापूर्वीच रेकॉर्डब्रेक अॅडव्हान्स बुकिंग मिळाले होते. 'KGF 2' या चित्रपटाने कोरोना काळानंतर देशभरात सर्वाधिक 5.15 लाख तिकिटे बुक केली. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ही आकडेवारी दिली आहे.

कोरोना काळानंतर जर बॉलीवूड चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगबद्दल बोलायचे झाले तर सुपरस्टार रणबीर कपूर आणि लैया भट्ट यांच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाला अॅडव्हान्स बुकिंग मिळाले होते. देशाबाहेरता 'ब्रह्मास्त्र'ची 3.02 लाख तिकिटे अॅडव्हान्स बुक झाली होती. चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये हे स्पष्टपणे दिसत आहे.

शाहरुख खान स्टारर 'पठान' या चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंग २० जानेवारीपासून भारतात सुरू झाली आहे. तेव्हापासून आजतागायत शाहरुखच्या या आगामी चित्रपटाच्या तिकिटांची बिनदिक्कत विक्री सुरू आहे. देशभरात प्रदर्शनाच्या तीन दिवस आधी, 'पठान'ची 2.65 लाख तिकिटे अॅडव्हान्स बुक झाली आहेत. 'पठान' चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंग असा अंदाज लावला जाऊ शकतो की हा चित्रपट ब्रह्मास्त्र आणि 'KGF 2' ला देखील मागे टाकू शकतो.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com