
Pathaan: शाहरुख खानचा 'पठान' चित्रपट प्रदर्शित होण्यास अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. या चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग खुप जोरात सुरु आहे. 'पठाण' चित्रपट किंग खानच्या कारकिर्दीतील बंपर ओपनर चित्रपट ठरणार आहे. ट्रेड विश्लेषकांचा मते, 'पठान' चित्रपटाच्या संदर्भात प्रचंड वाद असतानाही पहिल्या दिवशी 40 ते 45 कोटींची कमाई करण्याची शक्यता आहे.
पठान चित्रपट अनेक दाक्षिणात्य चित्रपटांचा रेकॉर्ड मोडित काढणार आहे. साऊथचे तीन मोठे चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कलेक्शन करत आहेत. जानेवारी महिन्यात प्रदर्शित झालेला थलपथी विजय आणि रश्मिका मंदान्ना यांचा 'वारीसू', 'थुनिवू' सोबतच चिरंजीवी आणि श्रुती हसनचा 'वॉल्टेयर वीरैया' चित्रपट आहे. हे तिन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई करत आहेत.
'वारीसू' आणि 'थुनिवू'च्या कलेक्शनने जगभरात २०० कोटींचा आकडा पार केला आहे, तर चिरंजीवीचा चित्रपटही १५० कोटींचा आकडा पार करत आहे. 2022 हे वर्ष बॉलिवूडसाठी खूप वाईट वर्ष होते. काही चित्रपट सोडले तर सर्व कमाईच्या बाबतीत फ्लॉप होते. सोबतच साऊथच्या सर्वच चित्रपटांनी रेकॉर्डब्रेक कमाई करून इतिहास रचला. 'RRR', 'KGF 2', 'Kantara' या चित्रपटांनी प्रचंड कमाई करून देशातच नव्हे तर परदेशातही धुमाकूळ घातला होता.
अशा परिस्थितीत 2023 हे वर्ष बॉलिवूडसाठी सर्वोत्कृष्ट ठरेल, अशी अपेक्षा आहे. अशातच सर्वांच्या नजरा शाहरुख खानच्या 'पठान' चित्रपटाकडे लागल्या आहेत. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'पठान' हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट असून यामध्ये दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम देखील दिसणार आहेत.
हा चित्रपट 250 कोटींच्या बजेटमध्ये निर्मित करण्यात आला असून ट्रेड अॅनालिस्टकडून कोट्यावधींची कमाई करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शाहरुख खानचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती जादू दाखवणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.