
Ved Collection Day 18: बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखचा दिग्दर्शित 'वेड' चित्रपट प्रदर्शित होऊन 18 दिवस पूर्ण झाले आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. पहिल्या आठवड्यापासूनच या चित्रपटाने ज्या प्रकारची कमाई केली आहे ते पाहून सर्वांनाच या कमाईवर विश्वास बसत नाही. हा चित्रपट ज्या वेगाने कमाई करत आहे, ते पाहता हा चित्रपट लवकरच ५० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करेल असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
चित्रपट समीक्षक आणि ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी 'वेड'चे कौतुक करत लिहिले होते की, 'वेड' या मराठी चित्रपटाने तिसर्या वीकेंडमध्ये उत्कृष्ट आकडेवारी नोंदवली आहे. या चित्रपटाने तिसऱ्या वीकेंडमध्ये 6.80 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट या आठवड्यात 50 कोटींचा व्यवसाय करणार आहे. पठान प्रदर्शित होण्यापूर्वी 'वेड'ने 50 कोटींचा आकडा पार केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाने 18 व्या दिवशी 85 लाखांची कमाई केली आहे. चित्रपटाने पहिल्या रिलीजच्या तिसऱ्या शुक्रवारी 1.35 कोटी रुपये, शनिवारी 2.72 कोटी रुपये आणि रविवारी 2.74 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाची एकूण कमाई 48.51 कोटींवर गेली आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या 'सैराट' चित्रपटाचे अनेक रेकॉर्ड लवकरच मोडणार आहे. 'सैराट' हा मराठी इंडस्ट्रीतील आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. तर 'वेड' हा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 'वेड' हा चित्रपट १५ कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता, तर 'सैराट' हा ४ कोटींच्या बजेटमध्ये बनवलेला चित्रपट होता. 'सैराट'चे देशात बॉक्स ऑफिस कलेक्शन 110 कोटींवर होते.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.