सारा अली खानसोबत भीषण अपघात; चेहऱ्याजवळ फुटला बल्ब, पहा व्हिडीओ

मेकअप रुममध्ये टचअप करत असताना अचानक तिच्या चेहऱ्याजवळ बल्ब फुटला
Sara ali khan
Sara ali khanSaam Tv

मुंबई - बॉलीवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) नेहमीच तिच्या फ्लर्टी स्टाईलसाठी ओळखली जाते. साराची फॅन फॉलोइंग खूप वाढली आहे. काही दिवसांपूर्वी साराच्या नाकावर जखम झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा साराच्या चित्रपटाच्या सेटवरील मेकअप रुममध्ये एक अपघात झाला आहे. मेकअप रुममध्ये टचअप करत असताना अचानक तिच्या चेहऱ्याजवळ बल्ब फुटला. याचा एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे.

सारा ही नेहमी सोशल मीडियावर सक्रीय असते. नुकतंच सारा अली खानने तिच्या मेकअप रुममधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. चित्रपटाच्या सेटवर मेकअप रूममध्ये हा अपघात झाला आहे. ज्यामुळे सारा खूपच घाबरली होती. खरंतर सारा अली खान मेकअप रूममध्ये टचअप घेत होती आणि तेव्हाच तिच्या चेहऱ्याजवळचा बल्ब फुटला.

Sara ali khan
अकोल्यात भाजप महिला आघाडीचे नाना पटोले यांच्या विरोधात आंदोलन

ही घटना रविवारी घडली, ज्याचा व्हिडिओ सारा अली खानने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. दरम्यान, सारा अली खान सध्या इंदोरमध्ये आहे, जिथे ती लक्ष्मण उतेकर यांच्या आगामी चित्रपटाची शूटिंग करत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत विकी कौशल आहे. हा चित्रपट कार्तिक आर्यन आणि क्रिती सेननच्या 'लुका छुप्पी'चा सीक्वल असल्याचे बोलले जात आहे. मात्र याबाबत अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com