Mrs Chatterjee Vs Norway: राणी मुखर्जीचा 'तो' चित्रपट काल्पनिक ? नॉर्वे दूतावासाच्या वक्तव्याने चर्चेला उधाण, नेमकं काय आहे प्रकरण?

आज प्रदर्शित झालेला हा चित्रपट काल्पनिक असल्याचं नॉर्वे दूतावासाने सांगत अशी प्रतिक्रिया दिली आहे.
Mrs Chatterjee Vs Norway Movie
Mrs Chatterjee Vs Norway MovieSaam Tv

Mrs Chatterjee Vs Norway Movie: अभिनेत्री राणी मुखर्जीचा ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ हा चित्रपट आज अर्थात १७ मार्च २०२३ ला भारतात प्रदर्शित झाला. सत्य घटनेवर आधारित असलेल्या चित्रपटात एका भारतीय जोडप्यावर नॉर्वेमध्ये घडलेल्या घटनेचे चित्रण करुन चित्रपट बनवण्यात आला. या दाम्पत्याला आपल्या मुलांची कस्टडी मिळवण्यासाठी नॉर्वे सरकारशी संघर्ष करावा लागला होता. दरम्यान, आज प्रदर्शित झालेला हा चित्रपट काल्पनिक असल्याचं नॉर्वे दूतावासाने सांगत अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Mrs Chatterjee Vs Norway Movie
Khayali Saharan: स्टँड-अप कॉमेडिन ख्याली सहारनवर बलात्काराचा आरोप; पीडित महिलेने घेतली पोलिसांत धाव

‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ चित्रपटात एका स्थलांतरित भारतीय जोडप्याच्या अनुभवावर आधारित आहे. २०१२ मध्ये त्यांच्या दोन मुलांना संस्कृतीतील भिन्नतेमुळे नॉर्वेजियन फॉस्टर सिस्टमने संशय उपस्थित करत कस्टडी घेतली होती. या कस्टडीविरोधात या दाम्पत्याने कोर्टात धाव घेतली होती.

“चित्रपटात वर्णन केल्याप्रमाणे सांस्कृतिक फरकांच्या आधारे मुलांना त्यांच्या कुटुंबापासून कधीही दूर नेले जाणार नाही. त्यांच्या हाताने खाणे किंवा मुलांना त्यांच्या पालकांसोबत अंथरुणावर झोपणे या गोष्टी मुलांसाठी हानिकारक मानल्या जात नाहीत आणि नॉर्वेमध्ये ते असामान्य नाहीत.” असं नॉर्वेच्या दूतावासाने आपल्या निवेदनात म्हटलंय. या चित्रपटातील काही सामान्य तथ्यं योग्यरित्या तपासणे आवश्यक आहे, असंही दूतावासाने नमूद केलंय.

Mrs Chatterjee Vs Norway Movie
'Mrs Chatterjee Vs Norway' review: राणी मुखर्जीच्या नव्या चित्रपटावर काय आहे चित्रपटप्रेमींची प्रतिक्रिया, Review जाणून घेण्यासाठी नक्की वाचा

“मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ हा चित्रपट जरी सत्य घटनेवर आधारित असला तरी, त्याची कथा पुर्ण काल्पनिक आहे. यामध्ये ज्या प्रकरणाचा संदर्भ दिला जात आहे, तो गेल्या १० वर्षांपुर्वी घडलेला किस्सा आहे. भारतीय अधिकाऱ्यांच्या सहकार्याने आणि सर्व पक्षांच्या सहमतीने सोडवला गेला होता. शिवाय नॉर्वेचे बाल कल्याण विभाग नफ्यावर चालत नाही. जितकी जास्त मुलं या संगोपन पद्धतीत टाकले जातील, तितके जास्त पैसे विभागाला मिळेल हा कथित दावा पूर्णपणे खोटा आहे. काळजी घेण्याच्या उद्देशाने विभाग काम करतं, ती पैसे कमावणारी संस्था नाही” असं नॉर्वे दूतावासाने त्यांच्या स्पष्टीकरणात म्हटलंय.

Mrs Chatterjee Vs Norway Movie
Prabhas:'वाढलेले केस, गळ्यात मफलर...'; प्रभासचा विचित्र लूक पाहून चाहते पडले बुचकाळ्यात

राणी मुखर्जीचा हा चित्रपट एका भारतीय महिला आणि तिच्या पतीच्या आयुष्यावरील खऱ्या कथेवरून प्रेरित आहे, ज्यांना नॉर्वेमध्ये त्यांच्या मुलांच्या ताब्यासाठी कायदेशीर लढा द्यावा लागला होता. या घटनेने आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वांचाच धक्का दिला होता.  हा चित्रपट कलकत्ता येथील एका बंगाली जोडप्याच्या सत्यकथेवर आधारित आहे. या चित्रपटात राणी मुखर्जीने दमदार अभिनय केला आहे. या चित्रपटातील राणीच्या अभिनयाशिवाय लोकांना चित्रपटाची कथाही खूप आवडली आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com