
Chiranjeevi Share Health Update On Twitter : साऊथचा स्टार चिरंजीवीबद्दलकाही दिवसांपूर्वी एक अफवा पसरली होती. चिरंजीवीला कॅन्सर झाला असल्याचे वृत्त सर्वत्र चर्चेत होतं. या बातमीमुळे त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. सोशल मीडियावर लोक कमेंट करू लागले. सर्वांना जाणून चिरंजीवीच्या आरोग्याविषयी जाणून घ्याचे होते. त्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत होते.
चाहत्यांची ही चिंता पाहून अखेर चिरंजीवीला यांना सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी पुढे यावे लागले. चिरंजीवीने ट्विटरवर स्वतःशी संबंधित परसरल्या वृत्ताला फेक म्हटले आहे. चिरंजीवीने सांगितले की त्यांना कधीच कॅन्सर झाला नव्हता... आणि आता असा कोणताही आजार नाही.
त्याने सांगितले की काही रूटीन टेस्ट झाल्या आहेत. यामध्ये कर्करोग नसलेले पॉलीप्स आढळून आले आहेत. जर चाचण्या झाल्या नसत्या तर कदाचित ते धोकादायक ठरले असते, पण आता घाबरण्यासारखे काही नाही. (Latest Entertainment News)
चिरंजीवीने तेलुगुमध्ये ट्विट केले आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की, काही दिवसांपूर्वी एका कॅन्सर सेंटरचे उद्घाटन करताना मी तुम्हाला सांगितले होते की, कॅन्सरबद्दल जागरूकता वाढवण्याची गरज आहे.
नियमित चाचण्या केल्या तर याला प्रतिबंध करता येतो आणि उपचारही करता येतात. यासोबतच त्यांनी सांगितले की जेव्हा त्यांच्या नियमित चाचण्या झाल्या तेव्हा त्यांना कॅन्सर नसलेल्या पॉलीप्सची माहिती मिळाली…. वेळेवर निदान झाल्यामुळे ते लगेच ठीक झालो.
योग्य वेळी उपचार न मिळाल्यास त्याचे कर्करोगात रूपांतर होऊ शकते. म्हणूनच मी म्हणतो की प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्यावी आणि वेळोवेळी वैद्यकीय चाचण्या करून घ्या.
चिरंजीवीचे हे ट्विट पाहून चाहत्यांच्याही जीवात जीव आला. कमेंट सेक्शनमध्ये आपले प्रेम व्यक्त करत आणि देवाचे आभार मानत चाहत्यांनी ट्विट केले आहे. श्रीधरने लिहिले, 'लव्ह यू बॉस', रवीने लिहिले, चिरंजीवी गुरू लाँग लिव्ह.... आणि हार्ट आणि स्मायली इमोजी भडीमार केला आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.