
City Of Dreams 3 Trailer Out: सध्या वेब विश्वातील अनेक वेब सीरिज बऱ्याच चर्चेत आहेत. त्यातीलच एक म्हणजे, ‘सिटी ऑफ ड्रीम्स’. या वेब सीरिजच्या पहिल्या आणि दुसऱ्या सीझनची चर्चा असताना, या सीरिजला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला या वेब सीरिजचा आगामी सीझन भेटीला येत आहे. नुकतंच या सीझनचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर आता याचा ट्रेलर भेटीला आला आहे.
काल सकाळी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर महत्त्वाचा निर्णय दिला. निर्णायकडे अवघ्या देशाचं लक्ष असताना, ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अगदी योग्य वेळ साधत ट्रेलर प्रदर्शित केला असल्याची प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणावर आधारलेल्या या वेबसीरिजमध्ये गायकवाड कुटुंबियांची कथा चित्रित करण्यात आली आहे. या सीरिजचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून ट्रेलर देखील कालच प्रदर्शित झाला असल्याने सध्या सीरिजची चर्चा बरीच सुरू आहे.
सध्या राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षाच्या आधारावर हा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात सत्तासंघर्षाचं राजकीय नाट्य सुरू आहे. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या ट्रेलरमध्ये, राज्यात सत्तेसाठी सुरु असलेला संघर्ष, गायकवाड कुटुंबातील कलह आणि विरोधकांची झलक पाहायला मिळत आहे.
सोबतच या ट्रेलरमधील अनेक संवाद प्रेक्षकांच्या मनात घर करून जात आहेत. इतर दोन सीझनपेक्षा हा सीझन नक्कीच काही तरी, खास असणार हे ट्रेलर पाहिल्यानंतर आपल्याला कळून येतं. पहिला आणि दुसऱ्या सीझनने ओटीटीवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. हा तीसरा सीझनही किती धुमाकूळ घालणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (OTT)
येत्या २६ मे रोजी ही वेब सीरिज ‘डिस्ने प्लस हॉटस्टार’वर प्रदर्शित होणार असून या मध्ये बॉलिवूडसह अनेक मराठी सेलिब्रिटी प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. वेबसीरिजमध्ये प्रमुख भूमिकेत प्रिया बापट सोबत अतुल कुलकर्णी, सचिन पिळगावकर, सुशांत सिंग, एजाज खान, रणविजय सिंग हे कलाकार झळकणार आहेत.
राजकीय ड्रामा असणाऱ्या या वेब सीरिजचे नागेश कुन्नूर यांनी या वेब सीरिजचे दिग्दर्शन केले. या वेबसीरिजचा पहिला सीझन १३ मे २०१९ ला तर दुसरा सीझन ३० जुलैला प्रदर्शित झाला होता. त्यानंतर ‘सिटी ऑफ ड्रीम्स’चा तीसरा सीझन येत्या २६ मे ला ‘डिस्ने प्लस हॉटस्टार’वर प्रदर्शित होणार आहेय.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.