
'ग्वाल्हेर' घराण्याच्या शास्त्रीय गायिका मालिनी राजूरकर (Malini Rajurkar) यांचे निधन झाले आहे. ८२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनामुळे भारतीय शास्त्रीय संगीतविश्वाची मोठी हानी झाली आहे. मालिनी राजूरकर यांनी हैद्राबाद येथील राहत्या घरी अखेरचा श्वास (Malini Rajurkar Dies) घेतला. त्यांचे पार्थिव हैदराबाद येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
मालिनी राजूरकर यांच्या निधनाची बातमी कळताच त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या निधनामुळे भारतीय संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. ग्वाल्हेर घराण्यातील प्रख्यात गायिका म्हणून मालिनी राजूरकर या फक्त देशातच नाही तर जगभरात प्रसिद्ध होत्या.
८ जानेवारी १९४२ रोजी जन्म झालेल्या मालिनी राजूरकर यांचे बालपण हे राजस्थानमध्ये गेले होते. अजमेरच्या सावित्री गर्ल्स हायस्कूल आणि कॉलेजमधून त्यांनी शिक्षण घेतलं होतं. गणितामध्ये त्या पदवीधर होत्या. अजमेरच्या संगीत महाविद्यालयातून त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले होते. याच ठिकाणी गोविंदराव राजूरकर आणि त्यांचा पुतण्या वसंतराव राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संगीताचे धडे घेतले.
मालिनी यांनी वसंतराव राजूरकर यांच्यासोबत लग्न केले होते. १९७० पासून त्या हैदराबाद येथे राहत होत्या. मालिनी यांचा आवाज प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा होता. बागेश्री,यमन आणि मारवा इत्यादी रागांचे त्यांनी गायन केले. त्यांनी देशभरात विविध संगीत महमोत्सवांमध्ये गायन केले होते. त्यांचा चाहतावर्ग खूपच मोठा होता. त्यांच्या कार्यक्रमाला प्रेक्षक मोठी गर्दी करायचे.
महत्वाचे म्हणजे, पुण्यामध्ये होणाऱ्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवामध्ये देखील त्यांनी गायन केले होते. त्याचसोबत, मुंबई, दिल्ली, राजस्थान येथील संगीत महोत्सवात देखील त्यांनी गायन केले होते. मालिनी राजूरकर यांना त्यांच्या उत्कृष्ट गायनासाठी अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. त्यांना २००१ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर २००८ मध्ये दीनानाथ मंगेशकर पुरस्कारने देखील त्यांना गौरवण्यात आले होते.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.