The Kapil Sharma Show: नरेंद्र मोदी कपिल शर्माच्या शोमध्ये येणार का? स्वत: PM मोदींनीच दिली महत्वाची माहिती

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 'द कपिल शर्मा शो' मध्ये हजेरी लावण्याची शक्यता आहे.
Kapil Sharma Invited Pm Modi
Kapil Sharma Invited Pm ModiInstagram

Kapil Sharma Invited Pm Modi: बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी 'द कपिल शर्मा' शो ची प्रमोशनसाठी नेहमीच निवड करतात. कपिलने त्याच्या स्वतःच्या कार्यक्रमातून स्वतःची एक वेगळीच ओळख प्रस्थापित केली आहे. विनोदाने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणाऱ्या कपिलचा 'द कपिल शर्मा शो' शो ही लोकप्रिय आहे.

या शो मध्ये आता पर्यंत सर्वच कलाकारांनी हजेरी लावली होती, पण आता या शो मध्ये भारतातील उच्च पदस्थ व्यक्ती हजेरी लावणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 'द कपिल शर्मा शो' मध्ये हजेरी लावण्याची शक्यता आहे.

Kapil Sharma Invited Pm Modi
Sushmita Sen: सुष्मिताचं जोरदार कमबॅक, रॅम्पवॉक करत दाखवला जबरदस्त जलवा

कपिल त्याच्या कार्यक्रमात हजेरी लावलेल्या सर्व कलाकारांची विशिष्ट शैलीत जबरदस्त फिरकी घेतो. नुकतच एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कपिल म्हणतो, या मुलाखतीत कपिलने करिअर, वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले. रेड कार्पेटवरील अनेक सेलिब्रिटींनी आजवर कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली आहे. या मुलाखतीत “पंतप्रधान नरेंद्र मोदी 'द कपिल शर्मा शो' मध्ये येणार का?”, असा प्रश्न कपिलला विचारला.

यावर कपिल म्हणतो, “मी जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलो, त्यावेळी मी त्यांना माझ्या कार्यक्रमात हजेरी लावण्याची विनंती केली होती. पण त्यांनी माझ्या कार्यक्रमात हजेरी लावण्यासाठी नकार दिला. सध्या तरी विरोधकांकडून माझ्याबाबत खूप विनोदी गोष्टी बोलल्या जात आहेत. कधीतरी तुझ्या शोमध्ये येऊ, असं मोदी म्हणाले होते.”

Kapil Sharma Invited Pm Modi
Ajay Devgn Movie: अजय देवगणची 'भोला यात्रा' ठाण्यातून सुरू; चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नवा उद्योग

कपिल शर्मा सध्या त्याच्या झ्विगाटो (Zwigato) या चित्रपटामुळे चर्चेत आहे, जो लवकरच रिलीज होणार आहे. कपिल शर्मा या चित्रपटात डिलिव्हरी बॉयच्या भूमिकेत असून त्याची व्यक्तिरेखा खूप गंभीर आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com