कॉमेडीयन राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीत होतेय सुधारणा; डॉक्टरांनी दिली ही माहिती

सध्या राजूवर व्हेटिंलेटरवर आहे. डॉक्टरांची संपूर्ण टिम राजूवर लक्ष ठेवून आहे.
Raju Shrivastav News
Raju Shrivastav NewsSaam Tv

मुंबई: राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत निकटवर्तीय, चाहते आणि कुटुंबीय कॉमेडियन (Comedian) राजूच्या चाहत्यांना वेळोवेळी माहिती देत आहेत. राजू श्रीवास्तव लवकर बरा व्हावा यासाठी सर्वच प्रार्थना करत आहेत. माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी डॉक्टरांनी संसर्गाचा धोका टाळण्यासाठी राजू श्रीवास्तवच्या व्हेटिंलेटर स्ट्रॉ बदलला आहे. यादरम्यान त्याच्या कुटुंबियाना देखील त्याला भेटू दिले जात नव्हते.

Raju Shrivastav News
Doctor G Trailer: 'डॉक्टर जी' चा ट्रेलर प्रदर्शित, स्त्रीरोग तज्ज्ञांचा चित्रपटात संघर्ष; ट्रेलर पाहून उडणार हास्याचे फवारे

अलिकडेच राजूची प्रकृतीत सुधारणा होत असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. डॉक्टरांनी राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा पाहून पत्नी शिखा आणि मुलगी अंतरा यांना भेटण्याची अनुमती दिली. मात्र राजूला वारंवार ताप येत असल्याने पुन्हा एकदा खबरदारी म्हणून भेटण्यास नाही सांगितले.सध्या राजूवर व्हेटिंलेटरवर आहे. डॉक्टरांची संपूर्ण टिम राजूवर लक्ष ठेवून आहे.

राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत दररोज काही ना काही चुकीच्या बातम्या सोशल मीडियावर (Social Media)व्हायरल होत असतात. या अफवा लक्षात घेऊन राजूची मुलगी अंतरा हिने तिच्या वडिलांच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. अंतराने तिच्या पोस्टमध्ये 'मी राजू श्रीवास्तव यांच्या सर्व चाहत्यांना आणि हितचिंतकांना सांगू इच्छिते की माझे वडील श्री राजू श्रीवास्तव यांची प्रकृती आता स्थिर आहे आणि ते बरे होत आहेत. असं तिने म्हटले आहे.

Raju Shrivastav News
'खतरों के खिलाडी सीझन १२' कोण जिंकणार? दिग्गज सेलिब्रिटिंची नावे आली समोर

सध्या राजू व्हेंटिलेटरवर आहे. दिल्लीतील एम्स रूग्णालयातील अपडेट आणि राजू श्रीवास्तवच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरील दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवावा असंही तिने म्हटलं आहे. दिल्लीतील एम्समध्ये डॉक्टर आणि त्यांची संपूर्ण टीम राजूवर मेहनत घेत आहे. कॉमेडीकिंग राजूच्या सर्व हितचिंतकांचे आम्ही ऋणी आहोत. सर्वांनी राजूसाठी आपले प्रेम आणि प्रार्थना सुरू ठेवावी ही विनंती तिने केली आहे.

Edited By- Manasvi Choudhary

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com