Raju Srivastav Health Update:राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; डॉक्टर म्हणाले...

कॉमेडी किंग राजू श्रीवास्तवर मागील एक महिन्यापासून दिल्लीतील एम्स रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
Raju Srivastava Instagram
Raju Srivastava InstagramInstagram/@rajusrivastavaofficial

मुंबई: कॉमेडियन(Comedian) राजू श्रीवास्तवचे निकटवर्तीय आणि चाहते तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी सतत प्रार्थना करत आहेत. मागील एक महिन्यापासून राजू श्रीवास्तव दिल्लीतील एम्स रूग्णालयात (AIIMS Hospital) दाखल आहे. रूग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखेखाली राजू श्रीवास्तववर उपचार सुरू आहेत याचदरम्यान मोठी अपडेट समोर आली आहे. राजू श्रीवास्तवला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

Raju Srivastava Instagram
Thank God : अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्राचा 'थँक गॉड' वादाच्या भोवऱ्यात ; नेमकं कारण काय?

कॉमेडी किंग राजू श्रीवास्तवर (Raju Srivastav) मागील अनेक दिवसांपासून रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अद्यापही राजू व्हेंटिलेटरवर आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार, राजू श्रीवास्तवर उपचार करण्यात कोणतीही कमतरता भासत नाही आहे. तरीही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होताना दिसत नाही. राजूला बरे करण्यासाठी डॉक्टर शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत.

Raju Srivastava Instagram
Salman Khan: सलमान खानची हत्या पनवेलच्या फार्म हाऊसवर करण्याचा कट, बिश्नोई टोळीचा प्लान बी उघड

राजूच्या कुटुंबाचा त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर पूर्ण विश्वास आहे. याचवेळी राजू श्रीवास्तवचे निकटवर्तीय आणि चाहते त्याच्यासाठी प्रार्थना करत आहेत. अलीकडेच, राजू श्रीवास्तवच्या भावाने सांगितले की, राजू १० ऑगस्टपासून रुग्णालयात दाखल आहे. दिवसेंदिवस राजूच्या प्रकृतीबाबत नवीन अपडेट समोर येत आहेत. आणि चिंता वाढते आहे. मात्र आमचा राजूवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि देवावर पूर्णपणे विश्वास आहे. आम्हाला अशी आशा आहे की, काहीतरी चमत्कार नक्की होईल.

राजू श्रीवास्तवने अनेक बॉलिवूड चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम केले आहे. 'मैने प्यार किया', 'बाजीगर', 'बॉम्बे टू गोवा' आणि 'आमदनी अठन्नी खर्चा रुपैया' यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्येही त्याने काम केले आहे, परंतु स्टँड-अप कॉमेडियनने राजूला लोकप्रियता मिळाली. राजू श्रीवास्तव प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'बिग बॉस'मध्येही दिसला होता.

Edited by- Manasvi Choudhary

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com