
Kushal Badrike Dance Video: अभिनेता कुशल बद्रिके त्याच्या कॉमेडी टाईमिंगसाठी ओळखला जातो. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात कुशल कॉमेडीसह डान्स देखील करतो. पण या वेळी डान्स करताना कुशल स्टेजवरून खाली पडला आणि तिथे उपस्थित अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकला.
कुशल बद्रिके सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कुशल चंद्रा या गाण्यावर डान्स करत आहे. यावेळी अमृता खानविलकर, सायली संजीव, हृता दुर्गुळे या अभिनेत्री तिथे होत्या. तसेच दिग्दर्शक रवी जाधव आणि नृत्य दिग्दर्शक उमेश जाधव देखील होते.
या सर्वांसमोर कुशल चंद्रा या गाण्यावर डान्स करत असतो. तर स्नेहल शिदं त्याला डान्स शिकविण्यासाठी पुढे येते. दोघेही डान्स करत असताना कुशल स्टेजवरून घसरतो आणि खाली पडतो. आधी पाहणाऱ्याला हा स्किटचा भाग आहे असे वाटू शकते. पण कुशल खरंच स्टेजवरून पडतो. हे पाहून सर्वच घाबरून जातात आणि त्याची चौकशी करण्यासाठी त्याच्या जवळ जातात.
कुशलने याच संदर्भात एक पोस्ट त्याच्या सोशल मीडियावर केली आहे. त्याने पोस्टला 'अमृता खानविलकरने केलेला चंद्राचा डान्स वाटतो तितका सोपा नाही बरं, आमच्या @snehalshidam चा जवळ जवळ “जीव गेला “, मला शिकवता शिकवता. शेवटी माझा नृत्याविष्कार बघून अमृताचाही जीव जाता जाता राहिला. एकदा अजय-अतुल यांना प्रत्यक्ष करुन दाखवेनच म्हणतोय माझा डान्स.' असे कॅप्शन दिले आहे.
कुशलने जरी हे सर्व त्याच्या स्वभावानुसार हसण्यावारी घेतलं असलं तरी पण तिथे उपस्थति सर्व काही धास्तावले होते. हे सर्व कलाकारांना झी चित्र गौरव पुरस्काराचे नामांकन मिळाले आहे. त्यानिमित्त सर्व कलाकार 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमात उपस्थित राहिले होते.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.