मेरी ब्रा का साइज भगवान ले रहे; श्वेताच्या वक्तव्याने वाद...(पहा व्हिडिओ)

छोट्या पडद्यावर प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीने भोपाळमध्ये केलेल्या एका वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
Shweta Tiwari
Shweta Tiwari Saam Tv

छोट्या पडद्यावर प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीने (Shweta Tiwari) भोपाळमध्ये केलेल्या एका वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. एका वेब सीरिजच्या प्रमोशनसाठी श्वेता तिवारी भोपाळला आली होती. फॅशन (Fashion) जगताशी संबंधित असलेल्या या वेबसीरिज (Webseries) विषयी सुरू असलेल्या एका चर्चा सत्रात बोलताना श्वेता तिवारीने आपल्या अंतर्वस्त्रांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. हे वक्तव्य तिने गमतीत केले असले तरी या वक्तव्यावर वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. (Controversy over Shweta Tiwari statement)

पहा व्हिडिओ-

श्वेता तिवारीच्या (Shweta Tiwari) एका नव्या वेब सीरिजच्या प्रमोशन भोपाळमध्ये सुरू आहे. तेव्हा श्वेता आणि या वेब सीरिजची (series) संपूर्ण टीम या सीरिजच्या प्रमोशनकरिता हॉटल जाहान नूमा पॅलेजमध्ये आली होती. त्यावेळी सुरू असलेल्या एका चर्चा सत्रामध्ये श्वेताने 'मेरी ब्रा का साइज भगवान ले रहे है' हे वादग्रस्त (Controversial) वक्तव्य केले आहे. भोपाळमधील अनेक लोक श्वेताच्या वक्तव्याचा निषेध करत आहेत.

Shweta Tiwari
मोठी बातमी! तब्बल 7 कोटींच्या बनावट नोटा जप्त, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

कसौटी जिंदगी की या मालिकेमधील अभिनयामुळे श्वेता तिवारीला विशेष लोकप्रियता मिळाली होती. तसेच बिग बॉसच्या चौथ्या सिझनची श्वेता ही विजेती स्पर्धक आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com