OMG 2 च्या सेटवर कोरोनाचा शिरकाव; पंकज त्रिपाठी, यामी गौतम मात्र निगेटिव्ह
यामी गौतम-पंकज त्रिपाठी- Saam Tv

OMG 2 च्या सेटवर कोरोनाचा शिरकाव; पंकज त्रिपाठी, यामी गौतम मात्र निगेटिव्ह

मुंबई : देशात कोरोना Corona रुग्णांची संख्या कमी होत असली तरीही कोरोनाचा विषाणू अधूनमधून उसळी मारताना दिसतो आहे. सध्या 'ओ माय गाॅड' च्या सिक्वेलचे OMG 2 शुटिंग सुरु आहे. मात्र, या शुटिंगच्या सेटवर कोरोनाचा शिरकाव झाल्यानं निर्मात्यानं शुटिंग Shooting काही काळासाठी गुंडाळलं आहे. सुदैवाने यातले कलाकार Artists आणि स्वतः दिग्दर्शक Director मात्र कोरोना निगेटिव्ह आले आहेत. Corona on set of OMG

बाॅलीवूड हंगामा या वेबसाईटने एका वृत्तपत्राच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. देशात दुसऱ्या लाॅकडाऊन नंतर चित्रपटांचे चित्रीकरण पुन्हा जोमाने सुरु झाले आहे. मात्र, सध्या सुरु असलेल्या OMG 2 च्या सेटवर मात्र कोरोना घुसला आणि त्याने अनेकांना बाधित केले. त्यामुळे पुढील काही आठवड्यांसाठी चित्रीकरण स्थगित ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला. चित्रपटाचे निर्माते अश्विन वर्दे यांनी हा निर्णय घेतला आहे.

यामी गौतम-पंकज त्रिपाठी
राज्यात 100% क्षमतेने थिएटर्स सुरु करा; अमोल कोल्हेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

सुरुवातीला एका क्रू मेंबरला कोरोनाची लागण झाली. त्याला क्वारंटाईन करण्यात आले व इतरांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्या निगेटिव्ह आल्या. त्यामुळे चित्रीकरण सुरु करण्यात आले. त्यानंतर तीन क्रू मेंबरना कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने पुन्हा एकदा चाचण्या करण्यात आल्या. त्यात सहा जण कोरोना बाधित असल्याचे सापडले. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव चित्रीकरण थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला. Corona on set of OMG

या चित्रपटात पंकज त्रिपाठी, यामी गौतम यांच्या भूमीका आहेत. हे दोघे व दिग्दर्शक अमित राय हे मात्र कोरोना निगेटिव्ह आहेत. आता हे चित्रीकरण बंद करण्यात आले असून आॅक्टोबर अखेरीस पुन्हा एकदा चित्रीकरणाला सुरुवात होईल, असे सांगण्यात आले आहे.

Edited By - Amit Golwalkar

Related Stories

No stories found.