Sachin Tendulkar: सचिनकडून प्रशांत दामलेला अंकासाठी स्पेशल शुभेच्छा, पोस्ट चर्चेत

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं प्रशांत दामलेंसाठी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. ही पोस्ट शेअर करुन सचिननं प्रशांत दामले यांचे कौतुक केलं आहे.
Prashant Damle And Sachin Tendulkar
Prashant Damle And Sachin Tendulkar Saam Tv

अभिनेते प्रशांत दामले गेल्या अनेक दिवसापासून मराठी नाट्यसृष्टीत कार्यरत आहे. त्यांनी अनेक लोकप्रिय नाटक, मालिका आणि रिअॅलिटी शो मध्ये महत्वाचे पात्र साकारले होते.त्यांच्या चित्रपटसृष्टीतील मोलाच्या कार्यामुळे सोशल मीडियावर ते सतत चर्चेत असतात. त्यांनी बऱ्याच नाटकांमध्ये महत्वपुर्ण भूमिका साकारले. त्यांच्या महत्वपुर्ण पात्रांमुळे ते आपल्या चाहत्यांमध्ये खास चर्चेत असतात.

Prashant Damle And Sachin Tendulkar
कुशल आणि हेमांगीची निखळ मैत्री, फेसबुकवर 'दोस्ता'साठी खास पोस्ट चर्चेत

नाटकांव्यतिरिक्त त्यांनी अनेक दर्जेदार चित्रपटही केले आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी टेलिव्हिजनच्या छोट्या पडद्यावरही कमबॅक केले होते. सध्या रंगभूमीवर त्यांचे ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ हे नाटक सुरु आहे. नुकताच काल भारतीय रंगभूमी दिन साजरा करण्यात आला. प्रशांत दामले नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात. या पोस्ट्समधून ते चाहत्यांसोबत संवाद साधत असतात.

Prashant Damle And Sachin Tendulkar
Samantha Ruth Prabhu: घटस्फोटानंतरही नागाचैतन्याला समांथाची काळजी, फोन करत प्रकृतीची विचारपूस

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) प्रशांत दामलेंसाठी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. ही पोस्ट शेअर करुन सचिननं प्रशांत दामले यांचे कौतुक केलं आहे. त्या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, 'मराठी माणसाच्या मनात मराठी रंगभूमीला एक मानाचे स्थान आहे.

प्रशांत दामले हे लोकप्रिय कलाकार आज त्यांचा 12500 वा प्रयोग सादर करत आहेत. एक मराठी रसिक म्हणून मला ही अभिमानास्पद गोष्ट वाटते. त्यांच्या या विक्रमी कारकीर्दीबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.' अशी पोस्ट सचिननं केली आहे.

अभिनेता प्रशांत दामले यांनी या नाटकाचा आज 12,501 वा प्रयोग सादर केला. त्यानिमित्ताने स्वातंत्र्यवीर सेवा प्रतिष्ठान आणि स्मृतिगंधतर्फे 'एका लग्नाची पुढची गोष्ट' (Eka Lagnachi Pudhchi Gosht) या नाटकाचा विनामुल्य प्रयोग ठेवण्यात आला.

या नाटकात मुख्य भूमिकेत प्रशांत दामले आणि कविता लाड मेढेकर पुन्हा एकत्र काम करताना दिसत असून अतूल तोडणकर, प्रतिक्षा शिवणकर, मृणाल चेंबूरकर, राजसिंह देशमुख, पराग डांगे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहे. नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन अद्वैत दादरकरने केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com