नजरेत धार, अंगात रग आणि हृदयात आग, तो पुन्हा येतोय; 'दगडी चाळ २’मधील अंकुश चौधरीचा फर्स्ट लूक

'दगडी चाळ 2' मध्ये प्रेक्षकांना नक्की काय पाहायला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Daagdi Chaawl 2 Poster
Daagdi Chaawl 2 PosterSaam Tv

मुंबई - 'दगडी चाळ' या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. हा चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर तुफान चालला होता. दगडी चाळमध्ये मकरंद देशपांडे यांच्यासह अंकुश चौधरी (Ankush Chaudhari) आणि पूजा सावंत (Pooja Sawant) मेन लीडमध्ये झळकले होते. त्यानंतर तब्बल ७ वर्षांनी या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आता या चित्रपटामधील अभिनेता अंकुश चौधरीचा लूक समोर आला आहे.

‘दगडी चाळ २’च्या नव्या पोस्टरमध्ये अंकुश सूर्याच्या भूमिकेमध्ये दिसत आहे. चेहऱ्यावर राग, भेदक नजर असा अंकुशचा लूक यामध्ये पाहायला मिळत आहे. तसंच पोस्टरवर “आय हेट यू डॅडी” अशी ओळ लिहिली आहे. त्यामुळे 'दगडी चाळ 2' मध्ये प्रेक्षकांना नक्की काय पाहायला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित, चंद्रकांत कणसे दिग्दर्शित 'दगडी चाळ 2' (Dagadi Chawl 2) हा चित्रपट 18 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला होता. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. टिझर पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत बरीच उत्सुकता आहे.

Daagdi Chaawl 2 Poster
आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकांना सामोरे जा; आदित्य ठाकरेंचे चॅलेंज

'दगडी चाळ'च्या निमित्ताने संगीता अहिर यांनी मराठी चित्रपटांच्या निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले. यापूर्वी त्याणी चित्रपटसृष्टीला अनेक दर्जेदार चित्रपट दिले आहेत. पहिल्याच चित्रपटाच्या यशानंतर आता त्या 'दगडी चाळ'चा सिक्वेल घेऊन सज्ज झाल्या आहेत. आता 'दगडी चाळ 2' मध्ये प्रेक्षकांना नक्की काय पाहायला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com