
Deepika's Comment On Shah Rukh Photo: नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर उदघाटन सोहळ्याला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. तर बॉलीवूड आणि हॉलिवूड कलाकार देखील यावेळी त्यांच्या थाटात दिसले. सर्वांनीच रेड कार्पेटवर त्यांची झलक दाखवली. तसेच सोशल मीडियावरही फोटो पोस्ट करायची संधी सोडली नाही.
अभिनेता शाहरुख देखील खूप हॉट दिसत होता. तो रेड कार्पेटवर आला नाही परंतु त्याचे फोटो मात्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. त्याचा फोटो पाहून तुम्हाला शाहरुख आर्यन खान असल्याचा भास होईल.
ब्लॅक रंगाचा व्ही-नेक टी-शर्ट, ब्लॅक पँट आणि ब्लॅक ब्लेझर, डायमंड पेंडेंटमध्ये घाललेला शाहरुखला खूप कमाल दिसत आहे. नीता मुकेश अंबानी कल्चर सेन्टरच्या कार्यक्रमात त्याची पत्नी गौरी खान, मुलगी सुहाना खान आणि मुलगा आर्यन खान देखील होते.
स्टायलिस्ट शालीना नाथानीने इव्हेंटमधील शाहरुखच्या लूकचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देत तिने लिहिले: "DEADDDDD!!!! तर तिच्या या पोस्टवर दीपिका पदुकोणने कमेंट केली आहे. दीपिकाने लिहिले आहे, "मी सुद्धा!". शाहरुखचा किलर लूक पाहून दीपिकाने 'मी मेले' अशी कमेंट केली आहे. त्यानंतर दीपिकाला चाहत्यांनी कमेंट करत शाहरुख सोबत सेल्फी शेअर करण्याची विनंती केली. त्यानंतर दीपिका आणि शाहरुख ट्रेंड कार्याला लागले आहेत.
दीपिका देखील या सोहळ्या एकदम रॉयल लूकमध्ये दिसली. तिने डिप व्ही नेक कॉर्डसेट घातला होता. तर त्यावर मिनिमल पण शाही दागिने घातले होते. क्रीम कलरच्या आऊटफिट वर तिने शाही टच देण्यासाठी हेवी वर्क असलेला लोळणारा श्रग देखील घातला होता. दीपिका या लूकमध्ये राजकुमारी दिसत होती.
शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण ब्लॉकबस्टर चित्रपट पठानमध्ये एकत्र दिसले होते. जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांनी देखील या चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. शाहरुखचे 'जवान' आणि 'डंकी' चित्रपट येणार आहेत. तर दीपिका हृतिक रोशनच्या 'फायटर'मध्ये दिसणार आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.