
अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी उत्तमोत्तम भूमिका साकारल्यानंतर अभिनेत्री आणि बिझनेस वुमन अशा दुहेरी भूमिकेत दिसत आहे. सिनेसृष्टीमध्ये यशाच्या शिखरावर असताना, बऱ्याच बॉलिवूड अभिनेत्रींनी स्वतःच्या व्यवसायाला सुरूवात केली.
गेल्या काही दिवसांपूर्वी परिणीती चोप्राने बिझनेसवुमन म्हणून नव्या इनिंगला सुरुवात केली होती. आता तिच्यानंतर दीपिका पदुकोण देखील तिच्या आयुष्यात नव्या इनिंगला सुरुवात करणार आहे. दीपिका फक्त एक अभिनेत्री नसून प्रसिद्ध बिझनेसवुमन सुद्धा आहे.
दीपिकाने गुडगावची स्पेशल असणाऱ्या चेन ब्लू टोकाई कॉफी मध्ये गुंतवणूक केली आहे. मात्र, तिने किती रुपयांची गुंतवणूक केली आहे, याबद्दलची माहिती मिळालेली नाही.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, दीपिका पदुकोणनेही सीरिज बी राउंड ऑफ फंडिंग (स्टार्टअप फंडिंग) मध्ये पैशांची गुंतवणूक केली आहे. दीपिका पदुकोणने तिच्या वेंचर फर्ममध्येही पैसे इन्वेस्ट केले आहेत. जानेवारी २०२३ मध्ये झालेल्या फंडिंग राऊंडमध्ये व्हेंचर फर्ममध्ये दिपीकाने पैसे गुंतवले होते.
या फेरीअंतर्गत, कंपनीने 650 रुपयांच्या मुल्यांकनाने 30 मिलियन डॉलर इतका निधी जमा केला होता. या निधी फेरीचे नेतृत्व A91 पार्टनर्सने केले होते. Anicut Capital, 8i Ventures, DSP Blackrock, Negen Capital, Mauryan Capital आणि White Whale Ventures सारखे गुंतवणूकदारही या फेरीमध्ये सहभागी झाले होते.
दीपिकाने आपली प्रतिक्रिया सुद्धा दिली आहे, ती म्हणाली, “आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून या ब्रँडच्या ग्रोथवर खूप प्रयत्न करीत आहोत. सोबतच कंपनीसमोर असलेलं व्हिजन आणि क्वालिटीच्या अनुषंगानेही आम्ही वचन लक्षात घेत पुढील ध्येय ठरवले. सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर ब्रँडच्या प्रवासात त्याच्यासोबत राहून आम्हाला खूप आनंद होत आहे.” दीपिका पदुकोणने पहिल्यांदाच बिझनेसमध्ये पैसे गुंतवलेले नाहीत.
तिने यापूर्वी अनेक कंपन्यांमध्ये आपले पैसे गुंतवलेय. दीपिका पदुकोणने आतापर्यंत Ka Enterprises, Atomberg Technologies, BluSmart, Purplle, Epigamia आणि Bellatrix Aerospace सारख्या स्टार्टअपमध्ये पैसे गुंतवले आहेत.
सध्या हा स्टार्टअप बिझनेस भारत आणि जपानसह ४ रोस्टरी आणि ८० पेक्षा जास्त फिजिकल आउटलेटसोबत काम करत आहे. या कंपनीचे भारतात दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळूर, हैद्राबाद, कोलकाता, चंदीगढ आणि मोहाली या शहरात कंपनीचे मुख्य कार्यालय आहे, तर जपानमध्ये टोकियो या शहरात कंपनीचे मुख्य कार्यालय आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.