Koffee With Karan : दीपिका पदुकोणने करण जोहरला दिला मोठा धक्का! असं झालं तरी काय?

दीपिका पदुकोण, निर्माता करण जोहरच्या 'कॉफी विथ करण-७' या चॅट शोमध्ये सहभागी होणार असल्याचे वृत्त होते. परंतु, याबाबत आता नवी अपडेट समोर आली आहे.
Koffee With Karan Deepika Padukone News
Koffee With Karan Deepika Padukone NewsSAAM TV

मुंबई: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण(deepika padukone) सध्या शाहरुख खानच्या(Shahrukh Khan) 'पठाण'(pathan) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. निर्मात्यांनी नुकतेच दीपिका पदुकोणच्या फर्स्ट लूकचे मोशन पोस्टर रिलीज केले, ज्यामध्ये अभिनेत्री हातात बंदूक घेऊन उभी आहे. तिच्या पहिल्या लूकमध्ये ती 'धाकड' अवतारात खूपच आकर्षक दिसत आहे. दरम्यान, दीपिका पदुकोण, निर्माता करण जोहरच्या 'कॉफी विथ करण-७' या चॅट शोमध्ये सहभागी होणार असल्याचे वृत्त होते. परंतु, याबाबत आता नवी अपडेट समोर आली आहे. त्यामुळे चाहते निराश होऊ शकतात. करण जोहरने पर्सनली आमंत्रण पाठवल्यानंतरही दीपिका 'कॉफी विथ करण-७'मध्ये सहभागी होणार नसल्याचे कळते.

Koffee With Karan Deepika Padukone News
David Warner : टायटॅनिकफेम डेव्हिड वॉर्नर यांचं निधन; कर्करोगाशी झुंज अपयशी

'कॉफी विथ करण' या फिल्म चॅट शोचा सातवा सीझन लोकांना खूप आवडला आहे. आत्तापर्यंत या शोचे तीन भाग प्रदर्शित झाले आहेत. जे प्रेक्षकांना खूप पसंत पडले आहेत. आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांनी शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये एकत्र सुरुवात करून प्रेक्षकांची मने जिंकली. यानंतर सारा अली खान आणि जान्हवी कपूर यांनी या शोच्या दुसऱ्या भागात हजेरी लावली. त्याचबरोबर अक्षय कुमार आणि सामंथा रुथ प्रभू तिसऱ्या भागात एकत्र दिसले होते. या सर्व स्टार्सनी त्यांच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफबद्दल अनेक किस्से या शोमध्ये शेअर केले.

Koffee With Karan Deepika Padukone News
Merry Christmas: सुट्टी संपली आता पुन्हा शूटिंग; कतरिना कैफचे फोटो झाले व्हायरल

एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, दीपिका पदुकोण करणच्या चॅट शो 'कॉफी विथ करण'च्या सातव्या सीझनमध्ये येऊ इच्छित नाही. ती या सीझनचा भाग असणार नाही. होस्ट करण जोहरने दीपिकाला शोमध्ये येण्यासाठी वैयक्तिक आमंत्रण पाठवले आणि तिला शोमध्ये सहभागी होण्यास सांगितले. परंतु दीपिकाने यावेळी शोमध्ये न जाण्याचा निर्णय घेतला आहे.

माहितीनुसार, निर्माता करण जोहरच्या चॅट शोमध्ये जाण्याबाबत तिने अद्याप काहीही स्पष्ट सांगितलेले नाही, परंतु दीपिकाकडे या शोमध्ये जाण्यासाठी कोणतेही खास कारण नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ती शोमध्ये न जाण्याचा निर्णय घेऊ शकते. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com