
मुंबई: सोनी एण्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध रिअॅलिटी शो इंडियाज् गॉट टॅलेंट (India's Got Talent) या डान्स शो ची भारतात चांगलीच क्रेझ आहे. कमी अवधित जास्त लोकप्रियता मिळवलेला हा शो महाराष्ट्रातही आवर्जू पाहिला जातो. यंदा या शोमध्ये मराठमोळ्या तरुणांचा डान्सिंग ग्रुप देशभर गाजतोय. 'डिमॉलिशन क्रू' (Demolition Crew) असं या ग्रुपचं नाव असून या ग्रुपने इंडियाज् गॉट टॅलेंटमध्ये आपल्या धमाकेदार परफॉर्मन्सने अवघ्या मराठीजनांना भुरळ घातली आहे. याच डान्स (Dance) ग्रुपने मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. राज ठाकरेंनीही त्यांचं कौतुक करत त्यांना ही स्पर्धा जिंकण्यासाठी या तरुणांना सर्वांनी व्होट (Vote) करावं असं आवाहन राज ठाकरे यांनी मराठीजनांना केलं आहे. (Demolition Crew Dance Group From India's Got Talent Meets MNS Chief Raj Thackeray)
हे देखील पहा -
राज ठाकरे यांनी आपल्या फेसबुक पेजवर लिहिलं की, "सोनी वाहिनीवरच्या 'इंडियाज गॉट टॅलेंट' या डान्स रिॲलिटी शोमध्ये सहभागी झालेल्या 'डिमॉलिशन क्रू' या ग्रुपच्या मुलांशी काल छान गप्पा झाल्या. अंबरनाथ, बदलापूरच्या सर्वसामान्य घरांतून आलेली ही मुलं अत्यंत कष्टाने, संघर्ष करत पुढे आली आहेत. या मुलांचा जन्मच जणू नाचण्यासाठी झालाय, इतकं उत्कृष्ट ती नाचतात. डान्स शोच्या अंतिम फेरीत पोहोचून 'डिमॉलिशन क्रू' हा ग्रुप विजयी ठरावा, यासाठी सर्व मराठीजनांनी त्यांना 'व्होट' करावं, हे माझं आग्रहाचं आवाहन." असं राज ठाकरे म्हणाले.
'डिमॉलिशन क्रू' या मराठमोळ्या डान्सग्रुपच्या परफॉर्मन्सने याआधीही इंडियाज गॉट टॅलेंटने धुमाकूळ घातला आहे. नुकतच 'जर्सी' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूर यांनी या शोमध्ये हजेरी लावली. यावेळी डिमॉलिशन क्रू च्या टीमने फटा पोस्टर निकला हिरो या शाहिदच्या चित्रपटातील 'धतिंग नाच' या गाण्यावर जबरदस्त डान्स करत सर्वांचीच मनं जिंकली.
दरम्यान, इंडियाज गॉट टॅलेन्ट शोमध्ये काही दिवसांपूर्वी माधुरी दीक्षित प्रमूख पाहूणी म्हणून आली होती. यावेळी तिने 'डिमॉलिशन क्रू' सोबत 'चने के खेत में' आणि 'घाघरा' या गाण्यावर ताल धरला होता. तसेच गुढी पाडवा विशेष भागात 'जर्सी' सिनेमाची स्टारकास्टही आली होती. यावेळी मृणाल ठाकूर, शाहिद कपूर यांनी 'डिमॉलिशन क्रू'सोब सेटवरच गुढी पाडवा साजरा केला. (Vote For Demolition Crew Raj Thackeray's Appeal)
Edited By - Akshay Baisane
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.