मुंबईत ‘देवमाणूस’ डॉ. अजित कुमारचे पुतळे

लोकं पुतळ्यासोबत सेल्फी काढून मालिकेविषयी आपलं प्रेम व्यक्त करत आहेत.
मुंबईत ‘देवमाणूस’ डॉ. अजित कुमारचे पुतळे
मुंबईत ‘देवमाणूस’ डॉ. अजित कुमारचे पुतळेSaam Tv

मुंबई - झी मराठी वाहिनीवर 'देवमाणूस' (Devmanus) या मालिकेने आपल्या वेगळ्या कथानकामुळे लोकप्रियतेचे चांगलेच शिखर गाठले होते. मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आणि प्रेक्षकांनी या मालिकेला पसंती देखील अधिक मोठ्या प्रमाणात दर्शवली होती. ऑगस्ट महिन्यामध्ये या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.

हे देखील पहा -

अशातच कोल्हापूर, सातारा, सांगली आणि मुंबई या ठिकाणी देवमाणूस मधील प्रमुख व्यक्तिरेखा साकारणारा डॉ. अजितकुमार देवचे अर्धाकृती पुतळे पाहायला मिळले. आपल्या ओळखीच्या परिसरात अचानक हे पुतळे पाहून प्रेक्षकांना देखील आश्चर्याचा धक्का बसला. लोकं पुतळ्यासोबत सेल्फी काढून मालिकेविषयी आपलं प्रेम व्यक्त करत आहेत.

मुंबईत ‘देवमाणूस’ डॉ. अजित कुमारचे पुतळे
अलिबाग प्रांताधिकारी कार्यालयात रंगली दारू पार्टी...

आता ही मालिका एका नव्या रुपात पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'देवमाणूस २' या नव्या मालिकेची पहिली झलक किरण गायकवाड ने इंस्टाग्रामवरती शेअर केली आहे. या मालिकेचा प्रोमोदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com