'या' 5 अभिनेत्यांचे फिटनेस बघून वयाचा योग्य अंदाज लावणे कठीण

सिनेसृष्टीतील फिटनेस फ्रीक अभिनेत्रींबद्दल तुम्ही खूप ऐकले असेल, पण आज आम्ही तुम्हाला अभिनेत्यांबाबद सांगणार आहोत.
'या' 5 अभिनेत्यांचे फिटनेस बघून वयाचा योग्य अंदाज लावणे कठीण
International Yoga Day 2022, 5 Bollywood fit actorsSaam Tv

International Yoga Day 2022: केळव अभिनेत्रीच नाही तर अभिनेते देखील त्यांच्या फिटनेसबाबत खूप गंभीर असतात.यामुळेच अनेक अभिनेते तासंतास जिममध्ये घाम गळत असतात. सिनेसृष्टीतील फिटनेस फ्रीक अभिनेत्रींबद्दल तुम्ही खूप ऐकले असेल, पण आज आम्ही तुम्हाला अभिनेत्यांबाबद (Actor) सांगणार आहोत. बॉलिवूडमध्ये (Bollywood) असे अनेक अभिनेते आहेत जे फिटनेसच्या बाबतीत कोणापेक्षा कमी नाहीत. या अभिनेत्यांची फिटनेस पाहून त्यांच्या वयाचा अंदाज लावणे कठीण आहे. (5 Bollywood fit actors)

हृतिक रोशन - अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) फिटनेसच्या बाबतीत अनेक अभिनेत्यांशी स्पर्धा करतो. हृतिक अनेकदा त्याचे शर्टलेस फोटो शेअर करतो, त्याचे वय 48 वर्षे आहे.पण त्याचे फिटनेस पाहून तो 48 वर्षांचा आहे याचा अंदाज लावणे कठीण आहे.

हे देखील पाहा -

शाहरुख खान - बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान (Shahrukh Khan)56 वर्षांचा झाला असला तरी त्याने स्वत:ला एकदम फिट ठेवले आहे. शाहरुख आपल्या घरच्या जिममध्ये तासनतास वर्कआउट करतो. किंग खानच्या फिट बॉडी पाहून अनेक लोक खूप प्रेरित आहेत. (International Yoga Day 2022 News)

मिलिंद सोमण - अॅथलीट, मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण (Milind Soman) 55 वर्षांचा आहे. पण त्याचा फिटनेस पाहून त्याचे नेमके वय कोणीही सांगू शकत नाही.मिलिंद हा शाकाहारी असून तो आपल्या आहाराची आणि फिटनेसची विशेष काळजी घेतो.

International Yoga Day 2022, 5 Bollywood fit actors
'या' व्यक्तीने तब्बल 20 वर्ष पिले नाही पाणी; कारण ऐकून थक्क व्हाल

जॉन अब्राहम - अभिनेता जॉन अब्राहम (john abraham) हा फिटनेसच्या बाबतीत नेहमीच पुढे असतो.जॉन योगापासून ते जिमपर्यंत सर्व काही करतो. त्यामुळे सर्वांच्या नजरा त्याच्या फिट बॉडी आणि अॅब्सवर असतात.

विद्युत जामवाल - अभिनेता विद्युत जामवाल (Vidyut Jamwal) 41 वर्षांचा झाला असला तरी तो अजूनही तरुण दिसतो. विद्युत त्याच्या फिटनेसबाबत खूप गंभीर आहे आणि त्याच्या शरीरात खूप लवचिकता आहे. विद्युत जामवाल तासनतास योगा करतो तसेच आपल्या डाईटची विशेष काळजी घेतो.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com