Jawan At Oscars: 'जवान' जाणार ऑस्करला? दिग्दर्शक अ‍ॅटली यांनी व्यक्त केली इच्छा

Jawan Collection: अ‍ॅटली दिगदर्शित 'जवान'ने १० दिवसात ८०० कोटींची कमाई करत विक्रम रचला आहे.
Atlee Jawan Director
Atlee Jawan Director Instagram @atlee47

Altee Want To Send Jawan For Oscars:

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने ५ वर्षांनी चित्रपटांमध्ये पुनरागमन केले. पुनरागमन करताच बादशाहने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. जानेवारीमध्ये प्रदर्शित झालेला 'पठान'ला दमदार यश मिळालं. तर नुकताच प्रदर्शित झालेला 'जवान' देखील भरघोस कमाई करत आहे.

अ‍ॅटली दिगदर्शित 'जवान'ने १० दिवसात ८०० कोटींची कमाई करत विक्रम रचला आहे. 'जवान'चे सवत्र कौतुक होत आहे. याच दरम्यान दिगदर्शक अ‍ॅटली यांनीही मोठे वक्तव्य केले आहे.

Atlee Jawan Director
Leo Kannada Poster: 'लिओ' गुन्हेगार आहे? थलापती विजयच्या कन्नड पोस्टरमध्ये दडलंय रहस्य

'जवान'ला मिळालेल्या यशाविषयी बोलताना अ‍ॅटली यांनी म्हटले की, 'चित्रपटाला ऑस्करच्या शर्यतीत पाहायचे आहे.'मुलाखतीत अ‍ॅटली यांना चित्रपट ग्लोबल लेव्हल घेऊन जाण्याविषयी विचारले. यावर प्रतिक्रिया देत अ‍ॅटली यांनी म्हटले आहे की, हा का नाही. 'जवान'ला देखील ऑस्करला गेलं पाहिजे.

माझ्या मते प्रत्येक माणूस, प्रत्येक कलाकार, प्रत्येक दिग्दर्शक आणि प्रत्येक तंत्रज्ञ आपलं पूर्ण जीव ओतून काम करत असतो. कारण त्याचं लक्ष गोल्डन ग्लोब, ऑस्कर आणि नॅशनल अवॉर्डवर असतं. मला पण 'जवान'ला ऑस्करला पाठवायचे आहे. मला वाटते जर शाहरुख खान सरांनी ही मुलाखत पहिली तर मी यावर त्यांचे देखील मत विचारणार आहे. मी त्यांना फोने करेन आणि विचारेन की आपण चित्रपट ऑस्करला पाठवू शकतो का?' (Latest Entertainment News)

'जवान' चित्रपटामध्ये शाहरुख खानचा डबल रोल आहे. या चित्रपटावर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा प्रभाव दिसत आहे. या चित्रपटामध्ये नयनतारा, दीपिका पदुकोण, सान्या मल्होत्रा, रिद्धी डोगरा आणि विजय सेतुपती मुख्य भूमिकेत आहेत. 'जवान'चे वर्ल्ड वाईड कलेक्शन ८०० कोटी झाले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com