Maharashtra Shaheer: गोष्ट पडद्यामागची; केदार शिंदेंनी शेअर केले ‘गाऊ नको किसना’ गाण्याचा भन्नाट व्हिडिओ

Maharashtra Shaheer Making Video: केदार यांनी नुकतेच या गाण्याच्या मेकिंगची व्हिडिओ शेअर केली आहे.
Maharashtra Shaheer Teaser Viral
Maharashtra Shaheer Teaser ViralInstagram @ankushpchaudhari

Kedar Shinde Share video of 'Gau Nako Kisana': केदार शिंदे दिग्दर्शित 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांना प्रेक्षक खूप आवडला आहे. 'महाराष्ट्र शाहीर' चित्रपटाची गाणी देखील प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. या गाण्यांनी प्रेक्षकांना थिरकायला भाग पडले आहे.

केदार शिंदे त्यांचे आजोबा 'शाहीर साबळे' यांच्या जन्म शताब्दीनिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटही 'बहराला हा मधुमास' हे गाणे प्रदर्शित झाले. या गाण्यावर अनेक सेलिब्रिटींनी देखील ताल धरला.

'बहराला हा मधुमास' या गाण्याच्या यशानंतर 'महाराष्ट्र शाहीर' चित्रपटातील 'गाऊ नको किसना' हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले. शाहीर साबळे यांच्या बालपणाचे दर्शन या गाण्यातून घडते. हे गाणे 'चंद्रा' गाण्याने सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेला चिमुकला जयेश खरेने गायले आहे.

Maharashtra Shaheer Teaser Viral
Anupama Update: अनुज 'अनुपमा'सोडणार? मालिकेत येणार नवीन ट्विस्ट

केदार यांनि नुकतेच या गाण्याच्या मेकिंगची व्हिडिओ शेअर केली आहे. हा व्हिडिओ शेअर करतकेदार शिंदे यांनी लिहिले आहे, 'रसिकांच्या प्रेमळ आग्रहाखातर, सादर करत आहोत कौतुकाचा वर्षाव होत असलेल्या ‘गाऊ नको किसना’ गाण्याचं स्टुडिओ मेकिंग. संगीतकार अजय-अतुल यांच्याबरोबर जयेश खरे आणि बच्चे कंपनीची पडद्यामागची धमाल गोष्ट एन्जॉय करा..'

‘गाऊ नको किसना’ गाण्याचं स्टुडिओ मेकिंगचा व्हिडिओमध्ये सर्व बालकलाकार दिसत आहेत. तसेच त्यांच्यासह संगीतकार जोडी अजय-अतुल आणि केदार शिंदे देखील दिसत आहेत. अजय सर्व चिमुरड्यांकडून गाणे गाऊन घेताना दिसत आहेत. त तुम्हाला वेगवगेळ्या वाद्यांची झलक देखील या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. या यशस्वी गाण्यामागची मेहनत पाहून तुम्हालाही या सगळ्यांचे पाठीवर कौतुकाची थाप द्यावी लागेल.

या आधी केदार शिंदे यांनी ‘गाऊ नको किसना’ या गाण्याच्या चित्रीकरणाच्या मेकिंग व्हिडिओ शेअर केला होता. तर पॉल मार्शलने त्याच्या या गाण्याचा नृत्यदिगदर्शन करतानाच अनुभव यावेळी शेअर केला. या व्हिडिओला प्रेक्षकांचं छान प्रतिसाद मिळाल्यानंतर आणि प्रेक्षकांच्या आग्रहामुळे निर्माते आणि दिग्दर्शक ‘गाऊ नको किसना’ गटांचे स्टुडिओ मेकिंग घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले.

'महाराष्ट्र शाहीर' चित्रपट २८ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षक या चित्रपटाचा आनंद घेऊन शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com