Chup On OTT: मनोरुग्णावर आधारित 'चूप' ओटीटीवर

'चुप' हा चित्रपट २५ नोव्हेंबर रोजी Zee 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
Chup Poster
Chup PosterSaam Tv

Chup Movie: 'चूप' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश प्राप्त केल्यानंतर आता ओटीटीच्या माध्यमातून प्रेक्षकांवर आपली मोहोर उमटविण्यासाठी सज्ज झाला आहे. चित्रपटातील सर्व पात्रांचे आणि कथेचे कौतुक समिक्षकांसह सर्वांनी केले होते.

Chup Poster
Bigg Boss Marathi 4: किरण माने बिग बॉसच्या घरातून बाहेर, मांजरेकरांनी दिली विशेष पॉवर

आर बाल्की दिग्दर्शित चित्रपटात मुख्य भूमिकेत दुलकर सलमान, सनी देओल, पूजा भट्ट, श्रेया धन्वंतरी अशा कलाकारांची फौज आहे. हा चित्रपट २५ नोव्हेंबर रोजी Zee 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. Zee 5 ने चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार हे जाहीर केल्यानंतर सध्या सोशल मीडियावर #Chup हा hashtag चांगलाच ट्रेंडिंगवर आहे.

Zee 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हिंदी भाषेसोबतच तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषेतही प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे.

Chup Poster
Sara Ali Khan and Varun Photo: सारा अली खान आणि वरुण धवनचा व्हॅकेशन मुड ऑन, सोशल मीडियावर नेटकरी करतायेत लाईकचा वर्षाव

चित्रपटाची कथा एका मनोरुग्णाच्या जीवनावर आधारित आहे, जो चित्रपट समीक्षकाची निर्घृण हत्या करुन मोकाट आहे. त्याच्या या हत्येमुळे समीक्षकांनी चित्रपटाचे समीक्षण करायचे बंद केले. या एकूण कथानकातून बाल्की यांनी त्यांच्या पद्धतीने चित्रपटसृष्टी आणि त्याभोवतालचं वातावरण यांवर कटाक्ष टाकला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com