दिग्दर्शिका रोशन बिंदरला ३७ लाखांच्या फसवणूकीच्या गुन्ह्यात अटक...

तक्रारदार महिला, हितेन व रोशन बिंदर या तिघांनी एक वेबसिरीज बनवायचे ठरवले होते. त्यात हितेनच्या सांगण्यावरुन तक्रारदार महिलेने ३७ लाख रुपये गुंतवले होते.
दिग्दर्शिका रोशन बिंदरला ३७ लाखांच्या फसवणूकीच्या गुन्ह्यात अटक...
दिग्दर्शिका रोशन बिंदरला ३७ लाखांच्या फसवणूकीच्या गुन्ह्यात अटक...Saam TV

मुंबई: वेबसिरीजसाठी (Web Series) घेतलेल्या ३७ लाख रुपयांचा अपहार करत फसवणुक (Fraud) केल्याप्रकरणी प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक रोशन बिंदर (roshan bhinder director) हिला वर्सोवा पोलिसांनी अटक केली आहे. अंधेरीतील यारीरोड-वर्सोवा परिसरात ५० वर्षीय तक्रारदार महिलेच्या इमारतीमध्ये अभिनेता हितेन जेठानंद तेजवानीही राहतो. तक्रारदार महिला, हितेन व रोशन बिंदर या तिघांनी एक वेबसिरीज बनविण्याचा निर्णय घेतला होता. त्यात हितेनच्या सांगण्यावरुन तक्रारदार महिलेने ३७ लाख रुपये गुंतवले होते. (Director Roshan Bhinder arrested for fraud of Rs 37 lakh)

हे देखील पहा -

द अदर्स (डी कोड) नावाची ही वेबसिरीज पूर्ण झाल्यानंतर त्याचे हक्क हार्ड डिस्क, उल्लू डिजीटल प्रायव्हेट लिमिटेड चॅनेलला विकून त्यातून मिळालेली रक्कम समान वाटून घेणार होते. त्यासाठी या तिघांच्या नावाने एक संयुक्त खाते उघडण्यात आले होते. मात्र बँकेत जमा झालेल्या या पैशांचा रोशन बिंदर यांनी परस्पर अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. त्यानुसार गुन्हा नोंदवून पोलिसांनी रोशन बिंदर हिला अटक केली आहे. सध्या ती न्यायालयीन कोठडीत आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com