Disha Patani: टायगर श्रॉफनंतर दिशा पटानी 'या' व्यक्तीला करत आहे डेट, जाणून घ्या कोण आहे हा मिस्ट्री मॅन?

दिशा एका मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट होत आहे.
Disha Patani Boyfriend
Disha Patani Boyfriend Saam Tv

Disha Patani Mystery Man: बॉलिवूड कलाकार त्यांच्या कामाव्यतिरिक्त त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील खूप चर्चेत असतात. एमएस धोनी या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात करणारी दिशा पटानी तिच्या रिलेशनशिप स्टेटसमुळे नेहमीच चर्चेत असते. दिशा पटानी बॉलिवूडच्या हॅण्डसम हंक टायगर श्रॉफला डेट करत होती. मात्र काही काळापासून त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. आता दिशा एका मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट होत आहे. टायगरनंतर दिशा या व्यक्तीला डेट करत असल्याचे बोलले जात आहे.

Disha Patani Boyfriend
Viral Video : 'टिप टिप बरसा पानी' गाण्यावरील शमा सिंकदरच्या डान्सने उडवली चाहत्यांची झोप; एकदा पाहून मन भरणार नाही

दिशा पटानी खूप फिटनेस फ्रीक आहे आणि ती नेहमीच तिचे शरीर आणि फिटनेसबद्दल खूप जागरूक असते. सध्या दिशा ज्या व्यक्तीसोबत दिसत आहे ती दुसरी कोणी नसून अलेक्झांडर अॅलेक्स अलिक आहे, जो फिटनेस ट्रेनर, मॉडेल आणि अभिनेता आहे. दिशा अनेकदा तिचे फोटो त्याच्यासोबत शेअर करत असते. अलेक्झांडर 'गिरगिट' नावाच्या वेब सीरिजमध्येही दिसला आहे. एवढेच नाही तर तो टायगर श्रॉफचा चांगला मित्र असल्याचेही बोलले जात आहे. (Celebrity)

दिशा पटानी अलेक्झांडर अॅलेक्सचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये दोघे एकमेकांसोबत मस्ती करताना आणि चिल करताना दिसत आहेत. अॅलेक्स हा दुसरा तिसरा कोणी नसून दिशा पटानीचा नवा बॉयफ्रेंड आहे असल्याचे म्हटले जात आहे. लवकरच दोघेही त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा करतील असा अंदाज चाहते बांधत आहेत. (Social Media)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com