Kanishka Soni: लग्नाबद्दल विचारलं तर बॉयफ्रेंडनं मारलं, अभिनेत्रीच्या धक्कादायक खुलाशानं खळबळ

'दिया और बाती' फेम अभिनेत्री कनिष्का सोनी हिने श्रद्धासाठी हळहळ व्यक्त केली आहे.
Kanishka Soni On Shraddha Walkar Case
Kanishka Soni On Shraddha Walkar CaseInstagram @itskanishkasoni

Kanishka Soni News: श्रद्धा आणि आफताबच्या प्रकरणाने संपूर्ण भारतात खळबळ उडाली आहे. 'दिया और बाती' फेम अभिनेत्री कनिष्का सोनी हिने श्रद्धासाठी हळहळ व्यक्त केली आहे. तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने सांगितले की, ती अशा मानसिकेतून गेले आहे.

कनिष्का सोनीने सांगितले की, 'श्रद्धाची व्यथा मी समजू शकते. मला आठवते की मला एका अभिनेत्याने लग्नासाठी विचारले होते. जेव्हा आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो तेव्हा मी त्याचा राग, हिंसक स्वभाव आणि ड्रिंकिंग हॅबिट सहन केल्या होत्या. मला वाटायचं की लग्नानंतर तो सुधारेल. तेव्हा मी जास्तीत जास्त वेळ घरीच असायचे. तेव्हा तो मला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्यास सांगत होता. परंतु यासाठी माझ्या घरांच्या विरोध होता आणि मला स्वतःला 'लिव्ह इन'मध्ये राहायचे नव्हते.'

Kanishka Soni On Shraddha Walkar Case
Hrithik Roshan-Saba Azad: गर्लफ्रेंडची मन्नत पूर्ण करण्यासाठी हृतिक रोशनने केला १०० कोटींचा खर्च

'मी बहुतेक वेळा त्याच्याच घरीच असायचे, कारण मला आमचं लग्न होईल अशी अपेक्षा होती. एक दिवस जेव्हा मी त्याला विचारले की आपण लग्न कधी करायचं. कारण तो लग्न करणार असे म्हणाला होता म्हणून त्याच्यासोबत राहत होते. मी त्याच्यासोबत अनेक स्वप्ने पहिली होती. माझ्या प्रश्नावर त्याला राग आला आणि त्या रात्री त्याने मला खूप मारले. तेव्हा माझ्या मनात ही भीती निर्माण झाली की तो मला केव्हाही मारू शकतो. त्याच रात्री मी माझे काही सामान घेऊन तेथून पळून आले. प्रेमामध्ये मुलांचे मी नेहमी हेच रूप पहिले आहे.' (Actress)

मला नाही वाटत आपल्या देशातील मुली लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये त्या व्यक्तीसोबत आयुष्यभर राहता यावे यासाठीच जातात. त्या टाइम पाससाठी इतका मोठा निर्णय घेणार नाहीत. आपल्या देशात जे वातावरण आहे त्यानुसार ह्या प्रकरणाला घेऊन प्रत्येकजण त्यांच्या सोयीनुसार तर्क लावत आहेत. मी सर्व मुलींना हेच सांगेन की, जरी देशातील परिस्थिती बदलली असली तरी जोपर्यंत तुम्ही त्या मुलाला पूर्णपणे ओळखत नाही, तोपर्यंत हा निर्णय घेऊ नका. (Relationship)

'अशा वाईट मानसिकतेच्या व्यक्तीशी लग्न करण्यापेक्षा मुलींनी एकटे राहून आपले आयुष्य जगलेले केव्हाही बरे. दुसरी गोष्ट मला सांगायची आहे की आमच्या इंडस्ट्रीतील स्टार्स या विषयावर काहीच का बोलत नाहीत. अतिशय धक्कादायक गोष्ट.' (Bollywood)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com